दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा सिनेमा म्हटल्यावर रेकॉर्ड होणार याबाबत शंकाच नसते. त्यांचा चित्रपट येणार म्हटल्यावर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. असेच काहीसे त्यांच्या नवीन चित्रपटाबाबत घडताना दिसत आहे. विशेष म्हणजे राम चरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण आणि आलिया भट्ट अशी जबरदस्त स्टार कास्ट असलेल्या ‘आरआरआर’ चित्रपटाबाबत मोठी माहिती समोर येत आहे. नुकतेच चित्रपटाच्या निर्मात्यांनी घोषणा केली आहे की, या चित्रपटाच्या हिंदी थिएट्रिकल अधिकारांचा करार १४० कोटी रुपयांमध्ये निश्चित झाला आहे. या चित्रपटाचे अधिकार जयंतीलाल गडा यांच्या पॅन स्टुडिओने मिळवले आहेत. या रकमेसह चित्रपटाने रिलीझ होण्यापूर्वीच तब्बल ९०० कोटी रुपये आपल्या खात्यात जमा केले आहेत. ही भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात मोठी रक्कम आहे. यासोबतच ‘आरआरआर’ने सिल्व्हर स्क्रीनवर धमाल करण्याची पूर्ण तयारी केली आहे.
मनोरंजन पोर्टल पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटाचे जगभर थिएट्रिकल अधिकार तब्बल ५७० कोटी रुपयांमध्ये विकले गेले आहेत. यामध्ये आंध्रप्रदेशच्या वितरकांनी सर्वाधिक १७० कोटी रुपये दिले आहेत. याव्यतिरिक्त हिंदी बेल्टला १४० कोटी रुपये, निजामला ७५ कोटी रुपये, कर्नाटकला ४५ कोटी रुपये, केरळ १५ कोटी आणि देशाबाहेर ७० कोटी रुपयांमध्ये चित्रपटाचे थिएट्रिकल अधिकार विकले गेले आहेत.
याव्यतिरिक्त चित्रपटाचे सर्व भाषांसाठी डिजिटल अधिकार हे १७० कोटी रुपयांमध्ये विकले गेले आहेत, तर सॅटेलाईट अधिकार १३० कोटी रुपयांमध्ये विकले गेले आहेत. गाण्यांचे अधिकार २० कोटी रुपयांमध्ये विकले गेले आहेत. अशाप्रकारे चित्रपटाने रिलीझ होण्यापूर्वीच तब्बल ९०० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
इतके कोटी रुपये आहे चित्रपटाचे अंदाजित बजेट
माध्यमांतील वृत्तानुसार, चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या या चित्रपटाचे एकूण अंदाजित बजेट जवळपास ३५० कोटी रुपये आहे. चित्रपट निर्मात्यांना अपेक्षा आहे की, हा चित्रपट जवळपास ५०० रुपयांची कमाई करू शकतो. यापूर्वी राजामौली यांच्या प्रभास अभिनित ‘बाहुबली- द कन्क्लूजन’ चित्रपटाने रिलीझपूर्वी ५०० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यावेळी तो एक विक्रम होता. आता राजामौली यांनी एक नवीन विक्रम रचला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-म्हणून सपनाला देसी क्वीन म्हणतात! अवघ्या काही दिवसांत सपनाच्या ‘या’ गाण्याला मिळालेत २ कोटी व्ह्यूज