Friday, July 5, 2024

प्रदर्शनाच्या दोन दिवस आधीच वादात सापडला ‘आरआरआर’ चित्रपट, ‘या’ कारणामुळे होतीये बॉयकॉट करण्याची मागणी

एसएस राजामौली यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘आरआरआर‘ २५ मार्चला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाची लोक खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. कोरोना महामारीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन अनेकवेळा पुढे ढकलण्यात आल होते. परंतु ज्युनियर एनटीआर आणि राम चरण तेजा अभिनीत चित्रपट जनतेचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. मात्र त्याआधीच या चित्रपटावरून वाद सुरू झाला आहे. काय आहे या वादाचे कारण चला जाणून घेऊ. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की ‘आरआरआर’ हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु तो कन्नड भाषेत प्रदर्शित होत नसल्याचे वृत्त समोर आले आहे. ही बातमी समोर येताच लोकांचा रोष उसळला आणि चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली. ट्विटरवर #BoycottRRRinKarnataka ट्रेंड करत लोक हा चित्रपट न पाहण्याबद्दल आवाहन करत आहेत. हा चित्रपट कन्नड भाषेतही प्रदर्शित व्हावा, अशी लोकांची मागणी आहे. ट्विटरवर असे डझनभर हॅशटॅग सहज सापडतात. काही लोक या चित्रपटाबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत, त्याचवेळी काही लोक चित्रपटातील कलाकार आणि टीमचे समर्थनही करत आहेत. एका यूजरने ट्विटरवर लिहिले की, “आम्ही टेलिग्रामवर ‘आरआरआर’ पाहणार नाही. हे तेलुगू राज्य नाही, कर्नाटक आहे. व्यवसायापेक्षा आदर महत्त्वाचा आहे. आणखी एका युजरने चित्रपटाच्या निर्मात्यांवर वचन मोडल्याचा आरोप केला आहे. नाराजी व्यक्त करताना एका यूजरने लिहिले की, कर्नाटकमध्ये RRR चित्रपटावर बंदी घालण्याची वेळ आली आहे.

दरम्यान ‘आरआरआर’ या चित्रपटात अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन भारतीय क्रांतिकारकांची कथा दाखवण्यात आली आहे. ही कथा ब्रिटिश राजवटीची आहे. हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर रिलीज होणार आहे. या चित्रपटापूर्वी अनेक भाषांमध्ये हा वाद सुरू झाला आहे. मात्र प्रेक्षकांच्या भेटीला येण्याच्या दोन दिवस आधीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण अशा दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा