एसएस राजामौली यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘RRR’ थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात राम चरण, आलिया भट्ट, ज्युनियर एनटीआर, अजय देवगन सारखी तगडी स्टारकास्ट आहे.चित्रपटातील या पात्रांबद्दल जवळपास सर्वांनाच माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला RRR चित्रपटातील खलनायकाबद्दल सांगणार आहोत. आता हा चित्रपट राजामौलींचा आहे, त्यामुळे त्यात खलनायकही खास असणार आहे. रे स्टीव्हनसनने RRR मध्ये खलनायकाची भूमिका केली आहे. चला जाणून घेऊया कोण आहे रे स्टीव्हनसन?
चित्रपटांमध्ये नायक किंवा नायिकेची भूमिका जितकी महत्त्वाची असते, तितकीच भूमिका खलनायकाची असते. चित्रपटांमध्ये खलनायक नसता, तर किती कंटाळवाणे झाले असते याची कल्पना करा. ‘RRR’ च्या खलनायकाबद्दल बोलायचे तर हॉलिवूड अभिनेता रे स्टीव्हनसनने या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तो एका ब्रिटिश अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.
रे स्टीव्हन्सन हा हॉलिवूड अभिनेता आहे. ‘रोम’ या टीव्ही शो आणि 2007 मध्ये रिलीज झालेल्या ‘किंग आर्थर’ या चित्रपटातून त्याला ओळख मिळाली. आजपर्यंत, स्टीव्हने 50 हून अधिक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. रे स्टीव्हन्सनने मार्व्हल स्टुडिओज निर्मित अमेरिकन सुपरहिरो चित्रपट थोर मध्ये वॉलस्टॅगची भूमिका केली होती.
आरआरआर चित्रपटाबद्दल बोलायचे तर हा देशभक्तीवर आधारित चित्रपट आहे. हे क्रांतिकारक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्यावर आधारित आहे, जे ब्रिटिश शासन आणि हैदराबादच्या निजामाविरुद्ध लढले. एसएस राजामौली दिग्दर्शित या चित्रपटाचे बजेट सुमारे साडेपाचशे कोटी आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-