Friday, March 29, 2024

अबब! बिग बॉस विजेती रुबिना होणार मालामाल, हातात मिळणार तब्बल ‘एवढ्या’ रुपयांचं बक्षीस

टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात विवादित शो म्हणून बिग बॉसचे नाव सर्वात पहिले घेण्यात येते. विवादित असूनही या शोला प्रेक्षकांचे तुफान प्रेम मिळते. ऑक्टोबर २०२० मध्ये बिग बॉसचे १४ वे पर्व सुरु झाले. अनेक लहान मोठ्या कलाकारांनी या पर्वात सहभाग घेतला होता. हे नवीन पर्व अनेक वाद आणि भांडणांमुळे गाजले, यातही बिग बॉस कोण जिकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर या मोठ्या प्रश्नाचे रविवारी उत्तर मिळाले. टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलयाकने बिग बॉसच्या विजेत्यांची ट्रॉफी आपल्या नावावर केली.

रविवारी या शोच्या ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने जेव्हा रुबिनाचे नाव घेतले तेव्हा सर्वांचं खूप आनंद झाला. रुबीनाने खूप चांगल्याप्रकारे हा खेळ खेळला. ती कायमच स्वतःच्या डोक्याने आणि विचार करून खेळली. तिने अनेकदा तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे बिग बॉसला देखील अनेक प्रश्न विचारले. तिच्या या हुशारीमुळे आज तिने बिग बॉसचे विजेतेपद मिळवले आहे. रुबिनाला या ट्रॉफी सोबतच बक्कळ कॅश प्राईज देखील मिळाले आहे. तिला ३६ लाख रुपये मिळाले आहे.

खरं तर यावेळच्या पर्वाची ५० लाखांची रक्कम प्राईज मनी म्हणून देण्यात येणार होती. मात्र अंतिम फेरीत पोहचलेल्या पाच स्पर्धकांना शोकडून एक पर्याय देण्यात आला होता. पर्याय असा होता, “अंतिम स्पर्धकांमधून जर कोणाला १४ लाख रुपये घेऊन बाहेर पडायचे असेल तर ते पडू शकतात. याच पर्यायाचा वापर राखी सावंतने करू घेत, १४ लाख रुपये घेऊन तिने हा खेळ सोडला. याच कारणांमुळे ५० लाखातून १४ लाख रुपये वजा करून ३६ लाख रुपये रुबिनाला मिळाले.”

मात्र तरीही रुबिनाला ही संपूर्ण रक्कम मिळणार नाहीये. याचे कारण म्हणजे रुबिनाला या रक्ममेवर आता टॅक्स भरावा लागणार आहे. भारत सरकारच्या नियमानुसार जर आपण लॉटरी, ऑनलाइन किंवा टीव्ही गेम शो आदी गोष्टींमधून कॅश प्राईज मिळवले, तर तुम्हाला त्यावर टॅक्स भरावा लागतो. सध्या इनकम टॅक्सचे दोन नियम आहेत. टॅक्स भरणारी व्यक्ती त्यांच्या इच्छेनुसार जुन्या अथवा नव्या नियमाच्या अंतर्गत हा टॅक्स भरू शकते.

जुन्या टॅक्सनुसार जर आपण पहिले तर रुबिनाला मिळालेली रक्कम १० लाखाच्या वर असल्याने त्यावर तिला ३० टक्के टॅक्स भरावा लागेल, शिवाय तिला एज्युकेशन सेस टॅक्स देखील भरावा लागणार आहे. हे सर्व मिळून तिला ९ लाख १९ हजार २७५ रुपयांचा टॅक्स भरून २६ लाख ८० हजार ७२५ रुपये मिळणार आहेत.

जर नवीन टॅक्सनुसार पहिले तर तिला इनकम टॅक्स ८ लाख १७ हजर ५०० रुपये आणि एज्युकेशन सेस ३२ हजार ७०० रुपये भरून हातात २७ लाख ५० हजार रुपये मिळतील.

हेही वाचा-

बिग बॉस चौदाच्या विजेत्या रुबीना दिलैकची लव्ह स्टोरी अशी झाली होती सुरु, पुढे अनेक संकटातून काढला मार्ग

संपुर्ण यादी: बीग बॉसचे आजपर्यंतचे सर्व विजेते; शो नंतर चमकले भाग्य, जीवनात झाले यशस्वी

अगं ताई, तो प्राईजचा टॅग तरी काढ!! अभिनेत्रीने लेबल न काढताच घातला ड्रेस, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; पाहा व्हिडिओ

 

हे देखील वाचा