Friday, March 29, 2024

हेमांगी कवीच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ पोस्टवर तृप्ती देसाईंनी उठवले प्रश्न; म्हणाल्या, ‘तेव्हा तू कुठे होतीस?’

मराठी सिनेसृष्टीतली अभिनेत्री हेमांगी कवी आपल्या बिनधास्त आणि धडाकेबाज अंदाजसाठी ओळखली जाते. सध्या तिची ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. सर्वत्र तिच्या या खुल्या विचारांचे स्वागत होत आहे. अगदी सर्वसामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनी तिच्या या पोस्टला आणि तिच्या विचारांना पाठिंबा दर्शवला आहे.

या यादीत प्रवीण तरडे, चित्रा वाघ यांसारख्या नामवंत कलाकारांचा समावेश आहे. मात्र भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी हेमांगी कवीच्या या पोस्टवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोडविरोधात रान पेटवलं तेव्हा तू कुठे होतीस?’ असा सवाल तृप्ती देसाई यांनी केला आहे. (trupti desai reacted hemangi kavis bai boobs and bra post)

तृप्ती देसाईंचा सवाल
तृप्ती यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर एक लांबलचक पोस्ट लिहिली. पोस्ट शेअर करत त्या म्हणाल्या की, “सदर अभिनेत्री आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोड च्या विरोधात रान पेटवले तेव्हा कुठे होत्या मला माहित नाही… त्यांच्या या जाहीर लेखाचे स्वागतच आहे, सर्वांनीच आता जाहीरपणे व्यक्त होणे ही काळाची गरज आहे. परंतु मला त्यांना आवर्जून सांगायचे आहे की, ज्या महिला या संदर्भात गॉसिप्स करतात किंवा उघडपणे बोलत नाहीत किंवा विकृत मानसिकतेचे पुरुष असोत त्यांचीच तर मानसिक बदलण्यासाठी आमचाही प्रयत्न आहे आणि तो करताना ट्रोलिंग, शिवीगाळ, हल्ले याला आम्हालाही सामोरे जावे लागले. परंतु त्यावेळी मात्र ना प्रवीण तरडे यांनी जाहीर पाठिंबा दिला, ना हेमांगी यांनी….जेव्हा महिलांना मासिक पाळी या विषयावरून दुजाभाव केला जातो, अनेक ठिकाणी बंदी घातली जाते, याविषयीही आम्ही कृतीत आंदोलने केली. परंतु अशा वेळेला असे लोक का साथ देत नाहीत हे समजले नाही.
इंदुरीकर तर जाहीरपणे महीलांच्या वेशभूषावर आणि महिलांबाबत बदनामीकारक वक्तव्य अनेक कीर्तनातून करत असतात. त्यावेळेला हे सर्व कुठे होते असाच प्रश्न पडतो? असो उशिरा का होईना परंतु धाडस करून लिहायला तरी सुरुवात केली “हे ही नसे थोडके.” मनापासून शुभेच्छा. माझी तर या जानेवारीपासूनच मनात एक संकल्पना अशी आहे की, आमच्या भूमाता फाऊंडेशनच्या माध्यमातून यावर्षीपासून आपल्या महाराष्ट्रात” #नो_ब्रा_डे” साजरा केला पाहिजे. या कृतीतून जेवढा संदेश जाईल तेवढा बदल होण्यास सोपे जाते. विरोध होईलच परंतु पुढाकार घेऊन करणेही तितकेच गरजेचे आहे. आम्ही जेव्हा हा दिवस साजरा करू तेव्हा स्वतःहून तुम्ही यात सहभागी व्हाल हीच अपेक्षा.

हेमांगी कवीची ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ पोस्ट


हेमांगी कवीने आपल्या बेधडक पोस्टमध्ये लिहिले होते की, “बाईने तिचे बुब्स (स्तन), त्याला असलेली पुरुषांसारखीच स्तनाग्रे (nipples, tits) आणि त्यांना धरून ठेवायला, झाकायला किंवा मला आवडत नाही पण लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा choice असू शकतो. मग ती घरी असो किंवा social media वर किंवा कुठेही! हाँ त्यावरून judge करण्याचा, त्याबद्दल घाणेरडया चर्चा आणि gossip करण्याचा सुद्धा ज्याचा त्याचा choice! पण यानिमित्ताने सांगावसं वाटतं…ब्रा, ब्रेसीयर (अंतर्वस्त्रा)चा चार लोकांसमोर किंवा social media वर तरी येताना वापरण्याचा, न वापरण्याचा, अश्लीलतेचा, त्या स्त्रीच्या संस्कारांचा, बुद्धिमत्तेचा आणि तिच्या image चा जो काही संबंध जोडला जातो त्यासाठी स्त्रियांना त्यांच्याच शारीरिक स्वातंत्र्यासाठी अजून किती struggle करायचाय हे लक्षात येतं!”

हेमांगी कवीची या पोस्टवर सध्या जबरदस्त चर्चा रंगली आहे. काहीजण यासाठी तिचे कौतुक करत आहेत, तर काहींनी तिला ट्रोल देखील केलेले पाहायला मिळाले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ज्येष्ठ नायिका सुरेखा सीकरी काळाच्या पडद्याआड! वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

-श्वेता तिवारीच्या मुलीचा ग्लॅमरस व्हिडिओ आला समोर; लवकरच ‘या’ चित्रपटातून मारणार बॉलिवूडमध्ये एंट्री

-अक्षया देवधरचा पारंपारिक साज! ‘पाठक बाईं’च्या गजऱ्यावर खिळल्या लाखो नजरा

हे देखील वाचा