Friday, April 19, 2024

धक्कादायक! टी-सिरीजचा मालक असणाऱ्या भूषण कुमार विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

नाव मोठं लक्षण खोटं अशी आपल्याकडे एके म्हण आहे. सध्या ही म्हण मनोरंजन विश्वातल्या अनेक कलाकरांना लागू पडत आहे. या इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय, प्रसिद्ध, मोठ्या, उच्च पदावर असणाऱ्या अनेक लोकांच्या विरोधात मागील काही काळापासून स्त्रियांवर दुष्कर्म केल्याचे आरोप लागले. त्यात आता अजून एका मोठ्या व्यक्तीचे नाव समाविष्ट झाले आहे.

प्रसिद्ध गायक, गीतकार गुलशन कुमार यांचा मुलगा भूषण कुमारवर नुकताच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण कुमार बॉलिवूडमध्ये अतिशय मोठ्या आणि प्रसिद्ध अशा टी-सिरीज कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर असून, या आरोपामुळे बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ माजली आहे. एका ३० वर्षीय महिलेने त्याच्यावर हा मोठा आणि गंभीर आरोप लावला आहे.

त्या महिलेच्या तक्रारीनुसार भूषण कुमारने टी-सिरीजमध्ये प्रोजेक्ट मिळवून देण्याच्या आश्वासनावर त्या महिलेसोबत बलात्कार केला. भूषण कुमारने २०१७ पासून ऑगस्ट २०२० पर्यंतच्या ३ वर्षाच्या काळात या महिलेवर अत्याचार केला.

महिलेने सांगितले की, तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्यात आला. पुढे ती असे देखील म्हणाली, की भूषण कुमार यांनी तिचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची तिला धमकी दिली होती. मुंबईमधील डीएन नगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

भूषण कुमार याच्याबद्दल अजून सांगायचे झाले, तर तो फक्त टी-सिरीजचा मालकच नाही तर तो अनेक चित्रपटांसाठी प्रोड्युसर म्हणून देखील काम बघतो. त्याने आजपर्यंत अनेक हिट आणि मोठ्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. २००१ साली त्याने ‘तुम बिन’ सिनेमातून पहिल्यांदा निर्माता म्हणून पदार्पण केले. ‘भूल भुलैया’, ‘आशिकी २’, ‘सनम रे’, ‘ऑल इज वेल’, ‘तुम्हारी सुलु’, ‘सरबजीत’, ‘बादशाहो’, ‘सत्यमेव जयते’, ‘भारत’ अशा मोठ्या आणि सुपरहिट चित्रपटांचा या यादीत समावेश आहे.

भूषण कुमारच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले, तर त्याने १३ फेब्रुवारी २००५ ला अभिनेत्री दिव्या खोसलासोबत लग्न केले आहे. या दोघांना एक मुलगा देखील आहे. दिव्या एक अभिनेत्री असण्यासोबतच एक दिग्दर्शिका देखील आहे. ती अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत असते.

२०१८ साली ‘मी टू’ चळवळीच्या वेळी देखील सोशल मीडियावर एका अज्ञात महिलेने त्याच्यावर शोषणाचा आरोप लावला होता, मात्र तेव्हा त्याने या सर्व आरोपांचे खंडन केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ज्येष्ठ नायिका सुरेखा सीकरी काळाच्या पडद्याआड! वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

-श्वेता तिवारीच्या मुलीचा ग्लॅमरस व्हिडिओ आला समोर; लवकरच ‘या’ चित्रपटातून मारणार बॉलिवूडमध्ये एंट्री

-अक्षया देवधरचा पारंपारिक साज! ‘पाठक बाईं’च्या गजऱ्यावर खिळल्या लाखो नजरा

हे देखील वाचा