Thursday, April 25, 2024

करीना कपूरच्या जास्त फी मागणीवर बोलली ‘द फॅमिली मॅन’ची प्रियामणि; म्हणाली, ‘यासाठी ती लायक…’

बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर खान ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती सध्या तिच्या ‘करीना कपूर खान्स प्रेग्नंसी बायबल’ या पुस्तकावरून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ती ‘सीता’ या चित्रपटात काम करणार असल्याची बातमी आली होती. तेव्हा अशी अफवा पसरली होती की, ती सीताचे पात्र निभावण्यासाठी १२ कोटी रुपये मागत आहे. त्यावेळी तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले होते. त्यावेळी अशी देखील बातमी आली होती की, चित्रपटाचे निर्माते दुसरी अभिनेत्री शोधत आहेत, कारण ती खूप जास्त फी मागत होती. तसेच या चित्रपटाची स्क्रिप्ट वीजयेंद्र प्रसाद लिहीत आहेत. याआधी त्यांनी ‘बाहुबली’ या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली होती. वेतन हा एक मुद्दा घेऊन अनेक चर्चा होत असतात. (Actress Priyamani said on kareena kapoor khan asking for the role of sita)

माध्यमातील वृत्तानुसार तापसी पन्नू, सोनम कपूर या सारख्या अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या मुलाखतीत यावर चर्चा केली आहे. आता करीना कपूर खानला अभिनेत्री प्रियामणिचे समर्थन मिळाले आहे. बॉलिवूड बबलसोबत बोलताना तिने सांगितले की, “फीच्या फरकावरून मी बोलू इच्छिते की, कोणतीही स्त्री यासाठी ती मागणी करते, कारण ती त्याची हकदार आहे. मला असे वाटते की, तुम्ही यावर प्रश्न उभे केले पाहिजे. यामध्ये काहीही चुकीचे नाहीये.”

प्रियामणि हिने तिचा मुद्दा पुन्हा एकदा मांडताना सांगितले की, “एका यशस्वी अभिनेत्रीने जर फिक्स फी सांगितली, तर त्यात काहीच चुकीचे नाहीये. आपण नेहमीच असे लेख वाचतो, जे कलाकारांच्या फी बाबत चर्चा करत असतात.” तिने पुढे सांगितले की, “ही स्त्री आज त्या ठिकाणी पोहचलेली आहे जिथे ती सांगू शकते की, तिला काय पाहिजे आहे. तुम्ही त्या व्यक्तीवर फक्त यासाठी कमेंट नाही करू शकत की, तुम्हाला हे सगळं चुकीचं वाटत. याचा अर्थ असा नाही की, ती व्यक्ती त्या गोष्टीच्या लायक नाहीये.”

याआधी करीना कपूर तिच्या पुस्तकाच्या नावावरून खूप चर्चेत आली होती. करीना कपूर खान आणि तिची सहलेखिका अदिती शाह त्यांनी करीनाच्या प्रेग्नंसीवर एक पुस्तक लिहिले आहे. ‘करीना कपूर खान्स प्रेग्नंसी बायबल’ या नावाचे पुस्तक त्यांनी प्रदर्शित केले आहे. परंतु या पुस्तकामुळे आता चांगलाच वाद उभा राहिला आहे. कारण या पुस्तकातील ‘बायबल’ या शब्दावर आक्षेप व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ही तक्रार अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने दाखल केली आहे. त्यांनी बीड येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तुझी-माझी जोडी जमली रे! घटस्फोटानंतर मिनिषा लांबा पुन्हा एकदा पडली प्रेमात; स्वत:च केले कबूल

-‘केजीएफ चॅप्टर २’ ला मिळतोय भरभरून प्रतिसाद; तब्बल ‘इतके’ व्ह्यूज मिळवून यूट्यूबवर केलाय राडा!

-ब्लु नाईटीमध्ये दिसली रुचिरा जाधव; अभिनेत्रीच्या हॉट अंदाजाने नेटकरी झाले घायाळ

हे देखील वाचा