‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवरून पहिला व्हिडिओ व्हायरल; मजेदार अंदाजात नाचताना दिसले भारती, सुदेश अन् कृष्णा


कॉमेडियन कपिल शर्मा हा प्रेक्षकांना हसविण्यात माहीर आहे. जेव्हा कपिलला बोलण्याची संधी मिळते, तेव्हा तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल यात काही शंकाच नसते. त्याचे चाहते तर त्याची एक झलक बघण्यासाठी उतावळे असतात. रविवारी (१८ जुलै) कपिल शर्माने ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच ऑनस्क्रीन येण्याची घोषणा केली आहे. यावरून ही गोष्ट स्पष्ट होत आहे की, शूटिंग आणि एडिटिंगचे काम जोरदार चालू आहे. (First video from the kapil sharma show is viral on social media)

यानंतर कपिल शर्माच्या शोच्या सेटवरून पहिला व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये भारती सिंग, सुदेश लहरी आणि कृष्णा अभिषेक डान्स करताना दिसत आहेत. ‘बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे’ या गाण्यावर ते डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करून भारती सिंगने लिहिले आहे की, ‘धमाकेदार पुनरागमन… लहानपणीच्या प्रेमासोबत नेहमीच मस्ती करा.” त्यांचा हा व्हिडिओ प्रेक्षकांना खूप आवडला आहे. प्रेक्षक यावर जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.

हा व्हिडिओ शेअर करते वेळी कपिल शर्माने देखील एक पोस्ट शेअर केली होती. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून टीमचे तीन फोटो शेअर केले होते. यासोबतच त्याने लिहिले होते की, “सगळ्या जुन्या चेहऱ्यांसोबत नवीन सुरुवात.” यासोबत त्याने हॅशटॅगमध्ये #blessings#gratitude#comingsoon असे लिहिले होते.

कपिल शर्मासोबत या शोमध्ये भारती सिंग, कीकू शारदा, सुमोना चक्रवर्ती, चंदन प्रभाकर आणि कृष्णा अभिषेक हे जुने कलाकार दिसणार आहेत. माध्यमातील वृत्तानुसार हा शो २१ ऑगस्टपासून टीव्हीवर दाखवला जाणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तुझी-माझी जोडी जमली रे! घटस्फोटानंतर मिनिषा लांबा पुन्हा एकदा पडली प्रेमात; स्वत:च केले कबूल

-‘केजीएफ चॅप्टर २’ ला मिळतोय भरभरून प्रतिसाद; तब्बल ‘इतके’ व्ह्यूज मिळवून यूट्यूबवर केलाय राडा!

-ब्लु नाईटीमध्ये दिसली रुचिरा जाधव; अभिनेत्रीच्या हॉट अंदाजाने नेटकरी झाले घायाळ


Leave A Reply

Your email address will not be published.