बोलके डोळे अन् निरागस चेहरा! ऋता दुर्गुळेच्या चेहऱ्यावर खिळल्या लाखो नजरा


महाराष्ट्राची लाडकी क्रश म्हणून ओळखली जाणारी ऋता दुर्गुळे अनेकदा तिचे दिलखेचक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. शिवाय आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिचे मनाला भुरळ पाडणारे फोटो बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरलही होतात, ज्याला चाहते भरभरून प्रेम देतात.

ऋताने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो चाहत्यांमध्ये चांगलाच पसंत केला जात आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये ऋताची सुंदरता कोणालाही वेड लावायला पुरेशी आहे. बोलके डोळे असलेल्या ऋताच्या या फोटोवर लाखो नजर खिळल्या आहेत. फोटोमध्ये ऋताच्या अदा अगदी जीवघेण्या आहेत, असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही. (HRUTA DURGULE’S GLAMOROUS PHOTO GOES VIRAL)

फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, ऋताने मागे बघून फोटोसाठी पोझ दिली आहे. सुंदर हेअरस्टाईल आणि परफेक्ट मेकअप करून, ऋता आता लाखो मने चोरताना दिसत आहे. हा फोटो पाहून चाहते देखील यावर भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये तिच्या सुंदरतेचे पूल बांधले जातायेत, तर आतापर्यंत या फोटोला तब्बल २ लाख ११ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.

ऋताने ‘फुलपाखरू’मध्ये वैदेहीची भूमिका साकारून अवघ्या प्रेक्षक वर्गाला भांबावून सोडलं होतं. तेव्हा पासूनच चाहते तिच्या प्रेमात आहेत. आता रवी जाधवच्या ‘टाईमपास ३’ द्वारे ऋता रुपेरी पडद्यावर एन्ट्री मारणार आहे. टाईमपासच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. आता तिसऱ्या भागात ऋताला पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एकेकाळी रिक्षाचे भाडे देण्यासाठीही नसायचे पैसे; राजपाल यादवने वाईट काळाबद्दल केली मोकळेपणाने चर्चा

-डब्बू अंकल यांचा नवीन डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, पुन्हा एकदा जिंकले प्रेक्षकांचे मन

-ओठांच्या सर्जरीमुळे बदलला सलमान खानच्या अभिनेत्रीचा लूक; ‘चेहरा बर्बाद केलास’, म्हणत नेटकऱ्यांनी केले ट्रोल


Leave A Reply

Your email address will not be published.