Thursday, March 28, 2024

‘हातात सिगारेट, महिलेचं ओंगळवाणं प्रदर्शन…’ रुपाली चाकणकर यांनी केला ‘अनुराधा’ वेबसीरिजच्या पोस्टरवर आक्षेप व्यक्त

मागील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर बॅन लिपस्टिक हे प्रकरण चालू होते. तेजस्विनी पंडित तसेच अनेक काही अभिनेत्री बॅन लिपस्टिक असे म्हणत व्हिडिओ शेअर करत होत्या. त्यानंतर काही दिवसांनी माहिती समोर आली की, त्यांचा आगामी ‘अनुराधा’ ही वेबसिरीज येणार आहे आणि त्या वेबसीरिजचे प्रमोशन चालले आहे. यामध्ये तेजस्विनी पंडित बोल्ड पहिल्यांदा एवढ्या बोल्ड अंदाजात दिसत आहे. वेबसीरिजच्या पोस्टरमध्ये देखील या ती बोल्ड अंदाजात दिसत आहे.

या वेबसीरिजच्या पोस्टरवर आपण पाहू शकतो की, तेजस्विनीने डार्क लाल रंगाची लिपस्टिक लावली आहे आणि ती हातात सिगारेट घेऊन बोल्ड अंदाजात पोझ देत आहे. अनेकांना तिचा हा बोल्ड लूक आवडला आहे, तर काहींनी मात्र या पोस्टरवर आक्षेप व्यक्त केला आहे. तिचा दाखवलेला हा बोल्डनेस महिलांचे चुकीचे प्रतिनिधित्व करत आहे. असे काही लोकांचे म्हणणे आहे. (rupali chakankar file complaint against anuradha web series)

अशातच राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी या पोस्टरवर आक्षेप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून या पोस्टरला विरोध व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, “एका वेबसिरीजच्या जाहिरातीसाठी महिलेच्या हातात सिगारेट देऊन तिचं ओंगळवाणं प्रदर्शन करत असल्याचे होर्डिंग्स फोटो समाजमाध्यमामधून फिरत आहेत आणि याबद्दल बऱ्याच तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत.” तसेच त्यांनी त्यांना आलेल्या पत्राचा फोटो ट्विटरवर शेअर करून ही माहिती दिली आहे. त्यांनी केलेले हे ट्विट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अनेकजण या ट्विटवर कमेंट करून त्याच्या ट्विटला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.

संजय जाधव दिग्दर्शित ‘अनुराधा’ नावाची वेबसिरीज येणार आहे. ही वेबसिरीज पूर्ण ७ भागांची असणार आहे.या वेबसीरिजमध्ये तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, सुकन्या कुलकर्णी मोने, सचित पाटील, सुशांत शेलार, विद्याधर जोशी, स्नेहलता वसईकर, संजय खापरे, आस्ताद काळे, विजय आंदळकर, चिन्मय शिंत्रे, वृषाली चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा :

अनुष्का शर्माने फिटनेसवर लक्ष देण्यास केली सुरुवात, वर्कआऊट करतानाचे फोटो केले शेअर

‘चक्की पिसिंग, पिसिंग अँड पिसिंग’, धर्मेंद्र यांचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर झाला व्हायरल

सुरुवातीच्या काळात साबण विकणाऱ्या रामानंद सागर यांनी ‘रामायण’ मालिका बनवत रचला होता लोकप्रियतेचा इतिहास 

 

 

हे देखील वाचा