रामायण हा चित्रपट काही दिवसापासुन चर्चेत आहे. आणि त्यातील प्रभु रामाची झलक काहि दिवसापुर्वीच निर्मात्यांनी दाखवली होती. तर आता प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर रामायण हा चित्रपट 2026 मधील सर्वाधिक अपेक्षित चित्रपटापैकी एक आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी आहेत. आणि रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच यश रावणाच्या भूमिकेत आहेत. तर आता अभिनेता, यशने एक चित्रपटां संबधीत एक स्पॉइलर शेअर केला आहे, जेणेकरुन या पहिल्या भागात काय होणार आहे याचा अंदाज येतो.
अभिनेता, यश माध्यमांशी बोलताना म्हणाला की, चित्रपटाचा अभिनेता आणि सह-निर्माता, यशने एक महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्याने खुलासा केला की तो आणि रणबीर कपूर ‘रामायण’च्या पहिल्या भागात एकत्र पडद्यावर दिसणार नाहीत. यशच्या मते, हा चित्रपट दोन भागांमध्ये बनवला जात आहे. पहिल्या भागाची कथा त्या दोघांच्या राज्यांवर आणि वैयक्तिक प्रवासावर अधिक लक्ष केंद्रित करते. यशने सविस्तर सांगितले, “विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या पहिल्या भागात आम्ही कधीही पडद्यावर एकत्र दिसलो नाही. तुम्हाला माहीतच आहे की, हा दोन भागांचा चित्रपट आहे.
रामायण या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असुन आता रामायणाचा पहिला भाग दिवाळीच्या वेळीस रीलीज होणार आहे. तर दुसरा भाग 2027 मध्ये रीलीज होत आहे. रणबीर आणि यश (yash)या चित्रपटा व्यतिरिक्त इतर प्रकल्पांमध्येही व्यस्त आहेत. टॉक्सिक या चित्रपटात यश लवकरच आता दिसणार आहे. तर रणबीर कपूर ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा


