Saturday, June 15, 2024

केवढी ती हिंमत! मधुबालाने लग्नाला मागणी घालूनही ‘या’ व्यक्तीने दिला होता नकार

बॉलीवूडमधील आजपर्यंतची सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणजे मधुबाला. अशा या अभिनेत्रीच्या प्रेमात अनेक स्टार वेेडे झाले होते. त्यावेळी मधुबालाला लग्नासाठी अनेक मागणी येत होती . परंतु त्यांनी त्या सगळ्या मागण्या नाकारल्या होत्या. पण जर मधुबालाने कुणाला लग्नाची मागणी घातली असती तर कोणत्याही पुरुषाने हसत हसत यासाठी होकार दिला असता. मात्र बॉलीवूडमध्ये एक असा व्यक्ती होता की ज्याने मधुबालाने घातलेल्या लग्नाच्या मागणीला नकार दिला होता आणि तो व्यक्ती म्हणजे बॉलिवूडमधील संगीतकार एस मोहिंदर. मधुबालाला त्या काळात मोहिंदर हे खूप आवडत असायचे. ती त्यांच्यावर जीवापाड प्रेम देखील करत होती. 

त्यावेळी मोहिंदर यांचे आधीच लग्न झाले होते. तरी देखील मधुबालाला ते मनापासून आवडत होते. तिने अनेक वेळा त्यांच्या समोर तिच्या प्रेमाचा खुलासा केला, एवढेच नाही तर तिच्या प्रेमाखातर तिने हे देखील म्हटले की, आपल्या लग्नानंतर मी तुझ्या बायकोचा आणि मुलांचा सगळा खर्च उचलायला तयार आहे. तिने मांडलेल्या या प्रस्तावाचा मोहिंदर यांनी अनेक दिवस विचार केला. पण शेवटी त्यांनी तिच्या सोबत लग्न करायला नकार दिला होता. त्यामुळे मधुबालाचे हृदय तुटले होते आणि ती खूपच नाराज झाली होती.

Photo Courtesy : Screengrab: Youtube/sHEMAROO

मधुबालाने एवढी मोठी ऑफर दिल्यानंतरही मोहिंदर यांनी त्यांच्या पत्नीला आणि मुलांबरोबर रहाणे पसंत केले होते. मधुबालाला याचे खूप दुःख झाले होते. ती शेवटपर्यंत मोहिंदर यांची वाट बघत होती आणि शेवटी तिला तिच्या आयुष्यात प्रेम मिळालेच नाही. मधुबालाचे वयाच्या 36 व्या वर्षी हृदयाच्या आजारामुळे त्यांचे निधन झाले. त्यावेळी तिने किशोर कुमार यांच्याशी लग्न केले होते.

किशोर कुमार यांचे लग्न केल्यानंतर काही दिवसातच मधुबालाला समजले की, तीचा आजार वाढतच चालला आहे आणि लग्नानंतर जवळपास नऊ वर्षे ती आजाराशी लढत होती. तिच्या या प्रसंगात देखील किशोर कुमार तिला जास्त वेळ देऊ शकले नाही. त्यावेळी मधुबालाला तिच्या घरातच औषधोपचार घेत होती. शेवटी 23 फेब्रुवारी 1969 रोजी तिचे राहत्या घरी निधन झाले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
किसी का भाई किसी की जान सिनेमातील ‘नय्यो लगदा’ गाणे प्रदर्शित, सलमान आणि पूजाच्या रोमॅंटिक केमिस्ट्रीने वेधले लक्ष

पीएम माेदींनी साऊथ कलाकारांची घेतली भेट; म्हणाले, ‘महिलांच्या सहभागाला…’

हे देखील वाचा