दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम त्यांच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘ससुराल सिमर का‘ ही अभिनेत्री लवकरच तिच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहे. दीपिका कक्कर-शोएब इब्राहिम यांनी फेब्रुवारीमध्येच त्यांच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा केला. आणि लवकरच ते आई-वडील हाेणार असल्याचे आनंदाची बातमी त्यांनी एका व्हिडिओद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली. यादरम्यान, अभिनेत्रीने बाळाच्या आगमानापूर्वी आणखी एक आनंदाची बातमी चाहत्यासाेबत शेअर केली आहे, ज्यामुळे चाहते आनंदाने उड्या मारत आहेत. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…
दीपिका कक्कर (dipika kakar) आणि शोएब इब्राहिम (shoaib ibrahim) सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांशी सतत जोडले असतात. इंस्टाग्राम व्यतिरिक्त ते यूट्यूबवरही स्वतःचा ब्लॉग चालवता. या ब्लॉगमध्ये ते आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अपडेट्स चाहत्यांना देत असतात.
अलीकडे, सोशल मीडियावर एक ब्लॉग शेअर करताना, या जाेडप्याने सांगितले की, ‘ते लवकरच त्यांच्या फाइव्ह बीएचके फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार आहे.’ खरे तर, दीपिका आणि शोएब 3 बीएचके फ्लॅटमध्ये राहतात आणि काही महिन्यांपूर्वी त्यांनी त्याच मजल्यावर 2 बीएचके फ्लॅट खरेदी केला होता. या व्हिडिओमध्ये शोएब आणि दीपिकाने सांगितले की, ‘ते हे दोन फ्लॅट एकत्र करून फाइव्ह बीएचके फ्लॅट बनवणार आहेत.’
दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांची पहिली भेट कलर्स शो ‘ससुराल सिमर का’च्या मालिकेदरम्यान झाली होती. या शोमध्ये दोघांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या शोदरम्यान दोघांची मैत्री झाली आणि लवकरच या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांनी 22 फेब्रुवारी 2018 रोजी लग्न केले.लग्नाच्या चार वर्षानंतर आता दोघेही आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. काही काळापूर्वी दीपिका कक्करच्या प्रेग्नेंसीला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले होते, ज्यावर अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर करून ट्राेलर्सला चाेख उत्तर दिले. (tv actress dipika kakar and shoaib ibrahim soon move into 5bhk apartment share details on youtube video )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“…एकदा गमावल्यानंतर पुन्हा…” रोनित रॉयने शेअर केलेल्या ‘त्या’ पोस्टवर स्मृती इराणींनी कमेंट करत विचारले…
शैलेश लोढा यांनी ‘या’ कारणासाठी केली तारक मेहता…च्या निर्मात्यांविरोधात केस दाखल