Friday, March 29, 2024

प्रसिद्ध दिग्दर्शकाला शेवटचा निरोप देण्यासाठी कलाकारांची हजेरी; जीतेंद्र म्हणाले, ‘त्यांना जाताना पाहू…’

जेव्हा एखादी व्यक्ती जग सोडून देवाघरी जाते, तेव्हा त्या व्यक्तीच्या जाण्याने त्याच्या कुटुंबासोबतच मित्रमंडळींवरही दु:खाचा डोंगर कोसळतो. असाच डोंगर सध्या बॉलिवूड कलाकारांवर कोसळला आहे. दिग्गज निर्माते आणि दिग्दर्शक सावन कुमार टाक यांचे गुरुवा री (दि. २५ ऑगस्ट) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. ते ८६ वर्षांचे होते. त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शुक्रवारी (दि. २६ ऑगस्ट) पवन हंस स्मशान भूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांना त्यांच्या लहान भावाने मुखाग्नी दिली. अशात, त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी अनेक कलाकार हजेरी लावताना दिसत आहेत.

सावन कुमार टाक (Saawan Kumar Tak) यांना शेवटचा निरोप देण्यासाठी त्यांच्या अंत्ययात्रेत प्रेम चोप्रा, दिग्दर्शक डेविड धवन, अशोक पंडित, सिद्धार्थ नागर, सुनील पाल, अभिनेत्री साहिला चड्ढा, ऍक्शन मास्टर शाम कौशल आणि इतर कलाकारांनीही हजेरी लावली. गायिका मधुश्री, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि अभिनेते राज मुराद यांनी सावन यांच्या घरीच त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली.

Saawan-Kumar-Tak-Funeral

सलमान खान याने त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली. राकेश रोशन यांनी गुरुवारीच सावन यांच्या घरी पोहोचत त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. अभिनेते जीतेंद्र यांचेही सावन यांच्यासोबत जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. त्यांनी संवेदना व्यक्त करत म्हटले की, “मी त्यांच्या अंत्ययात्रेत उपस्थित राहू शकलो नाही. कारण, मी त्यांना त्यांच्या अंत्ययात्रेवर जाताना पाहू शकत नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

जुहूच्या इस्कॉन मंदिरात दिवंगत सावन यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी शनिवारी (दि. २७ ऑगस्ट) पाच वाजता प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात येईल. सावन कुमार टाक हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक होते. त्यांनी १९६७मध्ये ‘नौनिहाल’ या सिनेमातून निर्माता म्हणून सुरुवात केली होती. पुढे त्यांनी १९७२मध्ये ‘गोमती के किनारे’ या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण केले होते. हा अभिनेत्री मीना कुमारीचा शेवटचा सिनेमा होता. त्यांच्या चर्चित सिनेमांमध्ये ‘सौतन की बेटी’, ‘हवस’, ‘सौतन’, ‘बेवफा से वफा’, ‘सनम बेवफा’ आणि ‘चांद का टुकडा’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
रणबीरच्या ‘त्या’ छोट्याशा कृतीने जिंकली चाहत्यांची मने, सर्वांसमोर धरले दाक्षिणात्य दिग्गजाचे पाय
बापरे! केबीसीच्या मंचावरच स्पर्धकाने शर्ट काढत मारली बायकोला मिठी, ‘अशी’ होती बिग बींची प्रतिक्रिया
नोपोटिझममुळे विजय देवरकोंडाने केले स्वत:लाच लाॅंच!, इंडस्ट्रीतील खडतर प्रवासाचा किस्सा समोर

हे देखील वाचा