विजय माल्याचा ‘किंगफिशर व्हिला’ बंगला विकत घेणाऱ्या अभिनेता सचिन जोशीला अटक


सध्या देशात सगळीकडे ईडी नावाचे वादळ अनेक सेलीब्रेटिंच्या भोवती फिरताना दिसत आहे. या वादळात अनेक आम आणि खास लोकांची नावे आली. अगदी राजकारणापासून ते मनोरंजन क्षेत्रापर्यंत सगळीकडे ईडीची करडी नजर पडत आहे. नुकतंच ईडीने हिंदी सिनेसृष्टीतील एका कलाकाराला अटक केली आहे.

ईडीने अभिनेता आणि व्यावसायिक सचिन जोशीला ओंकार रिअल्टर्सप्रकरणी अटक केली आहे . हे प्रकरण मुंबईच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या झोन-2 मध्ये रजिस्टर्ड आहे. सचिन जोशीने २०१७ साली विजय माल्याचा गोव्यातील किंगफीशर बंगला विकत घेतला होता. त्यानंतर तो खूप चर्चेत आला. सचिन जोशी JMJ ग्रूपचा प्रमोटर असून, हा ग्रुप पान मसाला, परफ्यूम, द्रव्य पदार्थ आणि दारुचा व्यवसाय करतात. शिवाय सचिन जोशी प्लेबॉय या रेस्टॉरंट आणि क्लब चेनच्या भारतीय फ्रेन्चायझीचा मालक देखील आहेत.

ईडीने समन्स बजावल्यानंतरही सचिन जोशी ईडीसमोर हजर राहिला नाही. त्यामुळेच ईडीने शनिवारी सचिन जोशीला त्यांच्या ऑफीसला आणत ताब्यात घेतले आहे. बांधकाम व्यवसायातील प्रतिष्ठीत समूह अशी ओळख असलेल्या ओमकार समुहाच्या माध्यमातून सचिन जोशीने आर्थिक घोटाळा केल्याचा संशय ईडीला होता. म्हणूनच त्यांनी सचिनला समन्स जारी केले. त्यानंतरही तो चौकशीसाठी ईडी समोर न आल्याने ईडीला अटकेची कारवाई करावी लागली.

यासोबतच टॉप्स ग्रूपप्रकरणी बॉलिवूड अभिनेता राज कपूरचे नातू अरमान जैन याला देखील ईडी दुसऱ्यांदा समन्स पाठवणार आहे. याआधी ईडीने अरमान जैनच्या घरावर धाड टाकत त्याला बुधवारी समन्स पाठवण्यात आला आणि गुरुवारी ईडी कार्यालयात दाखल होण्यास सांगण्यात आले होते. पण, अरमान जैनने खाजगी कारण असल्याचे सांगत चौकशीला येण्याचे टाळले होते. म्हणूनच आता पुन्हा एकदा ईडी त्याला समन्स पाठवणार आहे

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग याच्याशी चांगली मैत्री असल्याने टॉप्स ग्रूप प्रकरणाच्या तपासात अरमान जैनचे नाव आले. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंगची याप्रकरणी दोनवेळा चौकशी झाली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्हॅलेंटाईन डे स्पेशल! बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटांनी खऱ्या अर्थाने लोकांना शिकवले प्रेम करायला-अखेर प्रतिक्षा संपली! प्रभासच्या ‘राधे श्याम’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित, अभिनेत्याचा रोमँटिक अंदाज ठरतोय लक्षवेधी
-अभिनेत्री सोनम कपूरने चालू ट्रेनमध्ये केले पतीला ‘किस’, पाहा खास व्हिडिओ


Leave A Reply

Your email address will not be published.