काही दिवसांपासून दाक्षिणात्य सिनेसृष्टी आणि बॉलिवूडमध्ये हिंदी भाषेवरून चांगलाच वाद रंगला आहे. कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीपने (Kiccha Sudeepa) काही दिवसांपूर्वी हिंदी ही राष्ट्रभाषा नसल्याचा उल्लेख केला होता. त्यावरूनच हा वाद सुरू झाला होता. सुदीपच्या या वक्तव्यावर अजय देवगणनेही (Ajay Devgn) ‘तुम्ही तुमचे चित्रपट हिंदीत कशाला प्रदर्शित करता’ असा प्रश्न केला होता. तेव्हापासून हा वाद आणखीनच रंगला होता. आत्तापर्यंत टॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये रंगलेल्या या वादात आता मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरनेही (Sai Tamhankar) उडी घेतली आहे.
सई ताम्हणकर ही मराठी सिने जगतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयासाठी आणि बोल्ड लूकमुळे ती नेहमीच चर्चेत असते. अनेक विषयांवर ती आपले स्पष्ट आणि परखड मत व्यक्त करताना दिसत असते. सध्या सुरू असलेल्या हिंदी भाषेच्या वादातही तिने आता उडी घेतली आहे. या विषयावर बोलताना ती म्हणाली की, “या विषयावर आपण बोलायला नको कारण आपण सगळेच भारतीय आहोत. आपण विविध भाषेत चित्रपट काढतो कारण आपल्याकडे त्या भाषा बोलल्या जातात. त्यामुळे अशा वादावर आपण बोलणे टाळले पाहिजे, कारण आपण सगळेच सर्वात आधी भारतीय आहोत.”
दरम्यान सई ताम्हणकरने हिंदी तसेच मराठी सिने जगतातही अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यामुळे तिला सिने जगताचा चांगलाच अनुभव आहे. सई ताम्हणकरचे ‘दुनियादारी’, ‘मिमी’ असे अनेक चित्रपट सुपरहीट ठरले आहेत. तसेच अभिनेता स्वप्निल जोशीसोबतची तिची ‘समांतर’ वेबसिरीजही चांगलीच गाजली होती. यामधील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-