Friday, March 29, 2024

‘पेट पुराण’ सिरीजमधून सई ताम्हणकर दाखवणार प्राणीप्रेम, आगळीवेगळी कथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ही मराठी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने मराठी सिने जगतात चांगलीच ओळख निर्माण केली आहे. सई तिच्या अभिनयाइतकीच आपल्या बोल्ड आणि बिंधास्त वक्तव्यांसाठीही प्रसिद्ध आहे. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, ज्याची नेहमीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. सध्या अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या नवीन ‘पेट पुराण’ वेबसिरीजमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. त्याचप्रमाणे सईने या सिरीजमुळे तिची पाळीव प्राण्यांची भीतीही गेल्याचे तिने सांगितले आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर त्यांच्या आगामी ‘पेट पुराण’ या वेबसिरीजमुळे सध्या सर्वत्र चर्चचा विषय ठरले आहेत. नावाप्रमाणेच या सिरीजची कथाही आगळीवेगळी असणार आहे. ‘पेट पुराण’ सिरीजमध्ये सई एका अशा गृहिणीची भूमिका साकारणार आहे, जिला पाळीव प्राण्यांबद्दल विशेष प्रेम आणि भावनिक नाते आहे. त्यामुळे या सिरीजमध्ये सई आणि तिने पाळलेल्या कुत्र्यांमधील आणि मांजरीमधील त्यांचे विशेष नाते आणि हळवे प्रसंग दाखवण्यात आले आहेत. या सिरीजमध्ये सई आणि ललितने अतुल व अदिती नावाच्या विवाहीत जोडप्याची भूमिका साकारली आहे.

या आपल्या नव्या सिरीजबद्दल बोलताना सईने “या सिरीजमध्ये जरी माझे प्राणीप्रेम दाखवले असले, तरी मी प्राण्यांना खूप घाबरते” असे म्हणले आहे. तसेच या कार्यक्रमामुळे तिची प्राण्यांबद्दलची भितीही गेल्याचे मत सईने व्यक्त केले आहे. नुकताच या सिरीजचा ट्रेलर रिलीज झाला असून, त्याला प्राणी प्रेमींचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. तसेच अनेक प्रेक्षक आपल्या पाळीव प्राण्यांबद्दलचे प्रेम आणि हळवे प्रसंग सांगताना दिसत आहेत. ही सिरीज ६ मे २०२२ रोजी मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्‍याळम, कन्‍नड व बंगाली या भाषांमध्‍ये सोनीलिव्‍हवर सुरू होणार असून दिग्‍दर्शन व लेखन ज्ञानेश जोटिंग यांनी केले आहे तर  ह्यूज प्रॉडक्‍शन्‍सचे रणजित गुगले हे या सिरीजचे निर्माते आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा