‘सुंदरासाठी एक शब्द?’, सई ताम्हणकरच्या देसी अंदाजाला मिळतंय चाहत्यांचं भरभरून प्रेम


मराठी सिनेसृष्टीतली बोल्ड ऍंड ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सई ताम्हणकर या दिवसात तिच्या ‘समांतर २’ या वेब सीरिजमुळे बरीच चर्चित आहे. यातील तिच्या लूकचे आणि अभिनयाचे रसिकांकडून खूप कौतुक केले जात आहे. यात तिच्या ग्लॅमरस अंदाजालाही चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. मात्र नुकताच तिचा देसी लूकमधील एक फोटो समोर आला, जो चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

अलीकडेच सई ताम्हणकरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिचा देसी अंदाज पाहायला मिळाला आहे. गळ्यात मंगळसुत्र, कपाळावर टिकली, केसात गुलाब व अंगावर साडी, एकंदरीत असा लूक करून सईने सेल्फी क्लीक केला आहे. या देसी लूकमध्येही सई खूपच सुंदर दिसत आहे.

एरव्ही बोल्ड लूकमध्ये दिसणाऱ्या सईचा हा निराळा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. म्हणून हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “जेव्हा सुंदराचे काम चालू असते. एक शब्द सुंदरासाठी?” या फोटोला आतापर्यंत ८२ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच चाहते तिच्या या लूकचे भरभरून कौतुक करत आहेत. (sai tamhankar asking one word for her sundara look see photo)

सई ताम्हणकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, ती स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित अभिनित ‘समांतर २’ मध्ये झळकत आहे. यातील तिच्या पात्राला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. शिवाय ती लवकरच ‘कलरफुल’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच सई ताम्हणकर हिंदी इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘मिमी’ या हिंदी चित्रपटात ती झळकणार आहे. यात तिच्यासोबत क्रिती सनॉन मुख्य भूमिकेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.