Wednesday, June 26, 2024

‘मिलिये शमा से…’, ‘मिमी’मधील मराठमोळ्या सई ताम्हणकरच्या लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती

‘हंटर’ चित्रपटात झळकलेली मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ती बर्‍याचदा तिच्या इंस्टाग्राम हँडलवर स्वतःचे फोटो पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधत असते. तिला मराठी सिनेसृष्टीत बोल्ड ऍंड बिनधास्त अभिनेत्री म्हणूनही ओळखले जाते. नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा फोटो सईने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये सई अतिशय साध्या लूकमध्ये दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की, यात तिने सलवार कुर्ती आणि ओढणी परिधान केली आहे. साधे लूक असूनही यात अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे.

वास्तविक हा तिच्या आगामी ‘मिमी’ चित्रपटातील लूक आहे. क्रिती सेनन मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटात मराठमोळी सई देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “मिलिये ‘शमा’ से…आदाब.” नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. याला प्रेक्षकांनीकडून उत्तम प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला. (sai tamhankar’s look in mimi movie goes viral on internet)

सईच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती आता स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित अभिनित ‘समांतर २’ मध्ये झळकत आहे. शिवाय ती लवकरच ‘कलरफुल’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा