Saturday, March 2, 2024

सैफ-जयदीपच्या आगामी चित्रपटाच्या नावाचे अनावरण, या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार सिनेमा

सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) दिग्दर्शित फायटर हा सिनेमा सध्या थिएटरमध्ये प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. सिद्धार्थ आनंद यांच्या प्रोजेक्ट्सची त्यांचे चाहते नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच आता त्यांच्या ओटीटी प्रोजेक्टबाबत एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. सिद्धार्थ या चित्रपटात निर्माता म्हणून काम निर्णय असल्याची माहिती समोर आलेली आहे.

नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमध्ये रॉबी ग्रेवालच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटाच्या नावाचे अनावरण करण्यात आले आहे. याशिवाय यात काम करणाऱ्या कलाकारांचीही माहिती समोर आली आहे. या चित्रपटात सैफ अली खान (Saif ali khan) देखील दिसणार असल्याची चर्चा चालू आहे.

यासोबतच ‘जाने जान’ या चित्रपटातून वाहवा मिळवणारा जयदीप अहलावतही आपले अभिनय कौशल्य दाखवणार आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे नाव ‘ज्वेल थीफ’ आहे आणि तो या वर्षी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, देव आनंद अभिनीत मूळ चित्रपटाशी या चित्रपटाचा कोणताही संबंध नाही. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून या वर्षाच्या अखेरीस तो नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

सिद्धार्थ दिग्दर्शित फायटर हा चित्रपट लवकरच 200 कोटींचा पल्ला गाठणार आहे. हा चित्रपट गेल्या महिन्यात २५ जानेवारीला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. यात हृतिकशिवाय अनिल कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘भूल भुलैया 3’मध्ये विद्या बालन बनणार मंजुलिका, चित्रपटाची रिलीझ डेटही आली समोर
श्रेयस तळपदे -गौरी इंगवलेची जुळणार ‘ही अनोखी गाठ’? व्हॅलेंटाईन वीकमध्ये ट्रेलर प्रदर्शित

हे देखील वाचा