Monday, March 4, 2024

‘भूल भुलैया 3’मध्ये विद्या बालन बनणार मंजुलिका, चित्रपटाची रिलीझ डेटही आली समोर

भूल भुलैया आणि भूल भुलैया 2 यांच्या अभूतपूर्व यशानंतर चाहते अनेक दिवसापासून भूल भुलैया 3 या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. परंतु आता प्रेक्षकांची हि प्रतीक्षा संपली आहे. कारण यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 2023 मधील हा बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन (Kartik Aryan) मुख्य भूमिकेत असणार आहे. तसेच अनिस बज्मी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटातील सगळेच पात्र सुपरहिट ठरली आहे. परंतु त्यातली मंजुलिका हे पात्र सगळ्यांना खूप जास्त आवडले. याआधी हे पात्र तब्बू हिने केले होते. परंतु आता तिसऱ्या भागात एका नवीन अभिनेत्रींचे आव समोर आले आहे.

अभिनेता कार्तिक आर्यनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये विद्या बालन आणि कार्तिक आर्यन ‘मेरे ढोलना’वर डान्स करताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना कार्तिकने लिहिले की, “मंजुलिका ‘भूल भुलैया’च्या दुनियेत परत येत आहे, विद्याचे स्वागत करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. ‘भूल भुलैया 3’ या दिवाळीत हिट होणार आहे.”

विद्या बालन 2007 मध्ये आलेल्या ‘भूल भुलैया’ या चित्रपटात अक्षय कुमारसोबत मंजुलिकाच्या भूमिकेत दिसली होती. पण, त्याच्या सिक्वेलमध्ये कार्तिकच्या जागी अक्षय कुमारला घेण्यात आले. त्याचवेळी विद्या बालनही दिसली नाही. ‘भूल भुलैया 2’मध्ये तब्बू आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. विद्या बालनचे चाहते तिच्या चित्रपटात पुनरागमनाबद्दल सोशल मीडियावर त्यांच्या प्रतिक्रिया शेअर करत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘शेवटी, ती परत आली आहे.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘हे कमबॅक आहे.’ दुसऱ्याने लिहिले, ‘आता हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल.’

2007 मध्ये प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा ‘भूल भुलैया’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. यानंतर कार्तिक आर्यन अभिनीत ‘भूल भुलैया 2’ नेही बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. या चित्रपटात कार्तिक रूह बाबा म्हणून खूप प्रभावी होता. आता तिसऱ्या भागात प्रेक्षकांना काय विशेष मिळतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘श्रेयसच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी अक्षय कुमार सतत कॉल करत होता’, दीप्ती तळपदेने केला खुलासा
श्रेयस तळपदे -गौरी इंगवलेची जुळणार ‘ही अनोखी गाठ’? व्हॅलेंटाईन वीकमध्ये ट्रेलर प्रदर्शित

हे देखील वाचा