‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू ही सतत चर्चेत राहणारं व्यक्तिमत्त्व आहे. तिच्या पोस्ट्स दरदिवशी इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. तिचा चाहतावर्ग भलामोठा आहे. हे चाहते तिच्या प्रत्येक फोटोला आणि प्रत्येक व्हिडिओला भरभरून प्रेम देतात. हेच कारण आहे की, रिंकूने पोस्ट शेअर करता क्षणीच ती व्हायरल होऊ लागते. असाच एक व्हिडिओ चाहत्यांनी पुन्हा व्हायरल केला आहे.
रिंकू इंस्टाग्राम अधिक सक्रिय असल्याचे दिसून येते. याच प्लॅटफॉर्मवर तिने पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात रिंकू ‘धागा धागा’ या हिंदी गाण्यावर आपल्या अदा दाखवत आहे. तिचे स्मितहास्य पाहून कोणीही सहज तिच्या प्रेमात पडेल. यात तिने पांढऱ्या रंगाच्या साडीसोबत गुलाबी रंगाचं ब्लाउज घातलं आहे. एक वेणी घालून तिने अतिशय साधा लूक केला आहे. तुम्ही पाहू शकता की, इतक्या साध्या लूकमध्ये देखील रिंकू बऱ्यापैकी सुंदर दिसत आहे.
नेहमीप्रमाणे या व्हिडिओलाही नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. ४ तासांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत तब्बल ५२ हजारहून अधिक युजर्सने पाहिलं आहे. व्हिडिओ शेअर करून तिने चाहत्यांना खुश राहायचे आवाहन केले आहे.
रिंकूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिने काही दिवसांपूर्वीच ‘छूमंतर’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा आगामी चित्रपट लंडनमध्ये शूट करण्यात आला आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरू सोबत, प्रार्थना बेहरे, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेनाही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. तसेच रिंकूचा ‘झुंड’ हिंदी चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ बच्चन अभिनित या चित्रपटात, तिच्यासोबत आकाश ठोसरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-