Friday, March 29, 2024

लव्हस्टोरी: राजेश खन्नांवरील आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी डिंपल यांनी फेकून दिली होती ऋषी कपूर यांची ‘ती’ भेट

बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार म्हणून राजेश खन्ना ओळखले जातात. 1969 ते 1971 या काळात त्यांनी सलग 15 हिट सिनेमे दिले होते. यानंतर त्यांना बॉलिवूडचा सुपरस्टार हा किताब मिळाला. राजेश खन्ना यांना रोमँटिक हीरोच्या रुपात खूप पसंत केले गेले.

डोळ्यांची पापणी हलवणे आणि मान झुकवण्याच्या स्टाईलने लोक त्यांचे वेड होते. त्याकाळी अनेक तरुणी त्यांना रक्ताने पत्र लिहायच्या, तर काहींनी त्यांच्या फोटोबरोबरच लग्न केले होते. अशा या रोमँटिक हीरोची प्रेम कहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी रोमँटिक नव्हती.

राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडिया यांच्यासोबत 1973 मध्ये लग्न करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तब्बल 15 वर्ष वयाचे अंतर असलेल्या या जोडीची प्रेमकहाणी खूप रोचक आहे. गुरुवारी (8 जून)ला डिंपल आपला 66 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 8 जून, 1957 रोजी मुंबईत झाला होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या  प्रेमकहाणीबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया…

राजेश- डिंपल यांची पहिली भेट:
सन 1970 मध्ये राजेश खन्ना हे नवरंगपुरा स्पोर्ट्स क्लबमध्ये मुख्य अतिथी म्हणून आले होते. त्यांच्यासोबत डिंपल कपाडियासुद्धा तिथे उपस्थित होत्या. तेव्हा डिंपल राज कपूर यांच्या ‘बॉबी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होत्या. याच सिनेमातून त्या इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार होत्या. या कार्यक्रमात जेव्हा राजेश खन्ना यांनी डिंपल यांना पाहिले तेव्हा ते पाहताचक्षणी डिंपलच्या प्रेमात वेडे झाले.

डिंपल या तर राजेश यांच्या खूप मोठ्या फॅन होत्या. जेव्हा राजेश यांच्याकडून डिंपल यांना लग्नासाठी मागणी घातली गेली तेव्हा त्यांनी लगेचच होकार दिला. सुदैवाने डिम्पल यांच्या परिवाराने देखील या लग्नाला परवानगी दिली आणि या दोघांनी 1973साली लग्न केले.

या लग्नाबद्दलची थोडी रोचक आकडेवारी पाहू
राजेश खन्नांची जन्मतारिख- 19 डिसेंबर 1942
डिंपल कपाडियांची जन्मतारिख- 8 जून 1957
दोघांमध्ये वयाचे अंतर- 14 वर्ष 5 महिने आणि 10 दिवस
लग्न झाले तेव्हा दोघांचे वय- राजेश खन्ना- 31 वर्ष तर डिंपल कपाडीया 16 वर्ष
हे लग्न किती वर्ष टिकले- 9 वर्ष

ऋषी कपूर यांनी दिलेली अंगठी डिंपल यांनी काढून टाकली
‘बॉबी’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेस डिंपल आणि ऋषी कपूर यांच्या नात्याबद्दल अनेक बातम्या येत होत्या. त्यातच ऋषी कपूर यांनी डिंपल यांना एक अंगठी भेट म्हणून दिली. जेव्हा राजेश खन्ना यांनी डिंपल यांना समुद्र किनारी मागणी घातली, तेव्हा राजेश यांनी डिंपल यांना त्यांचे प्रेम सिद्ध करण्यासाठी ऋषी कपूर यांनी दिलेली अंगठी समुद्रात फेकण्यास सांगितले.

डिंपल यांनी क्षणाचाही विलंब न लावता ती अंगठी काढून समुद्रात फेकून दिली आणि राजेश यांच्यावरील त्यांच्या प्रेमाला सिद्ध केले.

लग्नानंतर डिंपल यांनी अभिनय सोडला होता
राजेश, डिंपल यांनी लगेचच 27 मार्च 1973 साली लग्न केले. त्यानंतर डिंपल यांचा ‘बॉबी’ हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने डिंपल यांना रातोरात स्टारडम मिळून दिले. मात्र तेव्हा डिंपल यांनी राजेश खन्ना यांच्या सांगण्यावरून अभिनय सोडला होता.

लग्नानंतर डिंपल यांनी त्यांच्या परिवारासाठी अभिनय करणं बंद केले. एकदा डिंपल यांनी सांगितले होते की, तेव्हा परिवारासाठी अभिनयापासून दूर राहण्याचा निर्णय मला योग्य वाटला होता. मी देखील तो मनापासून मान्य केला.

करियरसोबतच राजेश आणि डिंपल यांचे प्रेमही संपले
राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या लग्नानंतर राजेश यांचे सर्व चित्रपट फ्लॉप होत गेले. त्यामुळे याचा राग राजेश यांनी त्यांच्या परिवारावर काढायला सुरुवात केली. म्हणूनच राजेश आणि डिंपल यांच्यातील नाते संपण्यास सुरुवात झाली.

सतत होणारी भांडणे आणि वाद यामुळे डिंपल यांनी 1982 साली त्याच्या दोघी मुलींना ट्विंकल आणि रिंकी यांना घेऊन राजेश यांचे घर सोडले आणि त्याच्या आई, वडिलांच्या घरी राहायला गेल्या. डिंपल यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, राजेश यांच्याशी त्यांचे लग्न हा त्यांनी घेतलेला सर्वात चुकीचा निर्णय होता.

टीना मुनीम यांच्या येण्याने तुटले राजेश आणि डिंपल यांचे नाते
राजेश आणि टीना यांची जोडी 80च्या दशकातील लोकप्रिय जोडी होती. या दोघांनी अनेक सिनेमात काम केले. शूटिंग दरम्यान त्यांच्या अफेयरच्या अनेक बातम्या समोर आल्या. या दोघांचे नाते राजेश खन्ना यांनी एका मुलाखती दरम्यान काबुल केले होते. मात्र यांचे नाते जास्त काळ टिकले नाही.

डिंपल आणि राजेश खन्ना यांनी कधीच घटस्फोट घेतला नाही. 1982 सालापासून जरी ते वेगळे राहिले तरी त्यांच्या मुलींसमोर ते इतर आई, वडिलांप्रमाणेच वागत होते. शिवाय सार्वजनिक कार्यक्रम, पार्ट्या यांना देखील हे दोघं सोबतच जायचे. 18 जुलै 2012 साली राजेश खन्ना यांनी मुंबईत त्यांच्या आशीर्वाद या राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला. तेव्हा त्यांच्या सोबत डिंपल देखील होत्या.(dimple kapadia birthday special lovestory with rajesh khanna)

हे देखील वाचा