Monday, May 27, 2024

काय सांगता!! सलीम खान त्यांच्या मोकळ्या वेळात अर्धा-अर्धा तास बोलायचे राँग नंबरवर, पाच मुलांमुळे वाढले होते खूपच काम

बॉलिवूडमध्ये स्क्रीन रायटर आणि आपल्या जबरदस्त अभिनयाने सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणजे सलीम खान. 70 आणि 80 च्या दशकातील ते एक दिग्गज कलाकार होते. आजही संपूर्ण चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार त्यांच्या कामाची प्रेरणा घेऊन जोमाने काम करतात. त्यांनी ‘जंजीर’, ‘शोले’, ‘डॉन’, ‘शान’ यांसारख्या 23 सुपरहिट चित्रपटांची पटकथा लिहिली आहे आणि चित्रपटसृष्टीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.

नुकताच सलीम खान ( Salim Khan) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग सांगितले आहेत. या व्हिडिओला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

सलीम खान यांनी एका मुलाखतीत एका प्रश्नांचे उत्तर देताना सांगितले की, “तसं तर मी सगळ्यांशी बोलताना त्यांना असे सांगत असतो की, ‘मला एवढा वेळ असतो की, मी अर्धा- अर्धा तास राँग नंबरवर गप्पा मारतो.’ पण खरी गोष्ट अशी आहे की, मला असे वाटत होते की, माझी पाच मुले जेव्हा मोठी होतील, तेव्हा ते सगळे त्यांचं त्यांचं काम करतील आणि मी सगळ्या जबाबदारीतून रिकामा होईल. आपले आयुष्य एंजॉय करेल. पण तसं काहीही झालं नाही. उलट या पाच जणांमुळे माझं काम पाच पटीने आणखी वाढलं.”

सलीम खान यांच्या करियरची सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा इंदोरमधील एका लग्नात दिग्दर्शक अमरनाथ त्यांच्यावर खूपच प्रभावित झाले. त्यांनी सलीम यांना त्यांच्या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याची ऑफर दिली. त्यासाठी त्यांनी 1000 रुपये सायनिंग अमाऊंट आणि 400 रुपये महिन्याची सॅलरी अशी ऑफर दिली होती. परंतु त्यांनी ही ऑफर नाकारली आणि नंतर ते मुंबईला गेले. त्यांनतर त्यांच्या करिअरची गाडी इतक्या सुसाट वेगाने धावली की, जाऊन डायरेक्ट यशाच्या शिखरावर पोहोचली. (Salim Khan used to talk to wrong numbers for half an hour in his spare time)

आधिक वाचा-
‘टायगर 3’ला 11व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर बसला झटका, केली अगदीच कमी कमाई
केवळ 19 वर्षाची असताना त्रिधा चौधरीने केला चित्रपटसृष्टीत प्रवेश, ‘आश्रम’मधील इंटीमेट सीनमुळे होती चर्चेत

हे देखील वाचा