Friday, March 29, 2024

‘कभी ईद कभी दिवाली’च्या रूपाने भाईजान सलमान खान देणार फॅन्सला त्याच्या वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट

बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान एक असा अभिनेता आहे, ज्याच्या चित्रपटांची वाट त्याचे फॅन्स नेहमीच बघत असतात. सलमानचे सितारे मागील काही काळापासून बुलंदीवर असून, तो जो सिनेमा करतो, तो हिट होणार हे आधीच ठरलेले असते. एवढेच नाही तर त्याचे न चालणारे सिनेमे देखील १०० कोटींपेक्षा अधिकची कमाई करतात. सलमान खान कधीही त्याच्या चाहत्यांना निराश करत नाही. काही अपवाद वगळता प्रत्येक वर्षी त्याचा एक सिनेमा प्रदर्शित होतच असतो. सध्या देखील सलमानच्या हातात अनेक मोठे सिनेमे असून, तो त्यांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यासोबतच आता सलमान खानच्या अजून एका सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ‘कभी ईद तो कभी दिवाली’ हा सलमानचा बहुप्रतिक्षित सिनेमा याच वर्षी प्रदसरहित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

सलमान खानचा ‘कभी ईद तो कभी दिवाली’ हा सिनेमा याचवर्षी ३० डिसेंबर २०२२ ला प्रदर्शित होणार आहे. सलमान खान बहुतकरून दरवर्षी ईदच्या निमित्ताने त्याचे सिनेमे प्रदर्शित करत असतो. कधी टायचे सिनेमे दिवाळी तर कधी ख्रिसमसला देखील प्रेक्षकांच्या भेटीला येतात. सलमान खान आणि ईद हे मागील बऱ्याच वर्षांपासून समीकरण बनले आहे. ईदच्या निमित्ताने प्रदर्शित होणारे त्याचे सिनेमे तुफान गाजतात आणि सिनेमाच्या यशाच्या रूपाने फॅन्स त्याला ईदी देखील देतात. मात्र यावर्षी सलमान त्याचा ‘कभी ईद तो कभी दिवाली’ हा सिनेमा ईदला नाही तर त्याच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर आणि नवीन वर्षाच्या जवळपास प्रदर्शित करणार आहे.

साजिद नाडियादवाला प्रोडक्शन हाऊसने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून सलमानच्या ‘कभी ईद तो कभी दिवाली’ सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेचा खुलासा केला आहे. इंस्टाग्राम अकाउंटवर साजिद आणि सलमान खानचा फोटो शेअर करत या पोस्टमध्ये लिहिले गेले की, “‘कभी ईद तो कभी दिवाली’ चित्रपटाचा उत्सव नवीन वर्षाच्या सुरुवातीला सलमान आणि साजिद नाडियादवालासोबत.” या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत असून, चित्रपटात सलमानसोबत पूजा हेगडे दिसणार आहे. पहिल्यांदाच सलमान आणि पूजा सोबत काम करताना दिसतील.

प्राप्त माहितीनुसार या चित्रपटाची शूटिंग याचवर्षी एप्रिलमध्ये सुरु होणार असून, पोस्ट प्रोडक्शनचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाणार आहे. साजिद नाडियादवाला आणि सलमान खान यांचा सोबतच हा सातवा चित्रपट असून, याआधी त्यांनी जीत, जुड़वा, हर दिल जो प्यार करेगा, मुझसे शादी करोगी, जान-ए-मन, किक हे सिनेमे सोबत केले आहेत.

हेही वाचा – 

हे देखील वाचा