Friday, July 5, 2024

आज कोट्यवधींचा मालक असलेल्या सलमानची पहिली कमाई होती 75 रुपये, ताज हॉटेलमध्ये केलेला डान्स

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा (Salman Khan) आज वाढदिवस आहे. भाईजान आज त्याचा 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. सलमान खानच्या चाहत्यांनाही त्याच्या वाढदिवसाची खूप उत्सुकता आहे. सलमान खानचा इंडस्ट्रीत वेगळा दर्जा आहे, त्यामुळे त्याला बॉलिवूडचा ‘गॉडफादर’ देखील म्हटले जाते. आज करोडोंवर राज्य करणाऱ्या भाईजानची पहिली कमाई ७५ रुपये होती. सलमानला बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर मानला जातो. त्याच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी जाणून घेण्यात चाहते प्रचंड उत्सुकता दाखवतात. तर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्याशी आणि करिअरशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.

सलमान खानचा जन्म 27 डिसेंबर 1965 रोजी प्रसिद्ध बॉलिवूड लेखक सलीम खान यांच्या कुटुंबात झाला. सलमानचा वाढदिवस त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही. सलमान खानने 1988 मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटाद्वारे अभिनयाच्या जगात प्रवेश केला. यामध्ये त्याने सहाय्यक भूमिका साकारली होती. सलमान खान आज बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहे, पण फार कमी लोकांना माहित असेल की भाईजानची पहिली कमाई फक्त 75 रुपये होती.

सलमान खानने एकदा सांगितले होते की, त्याची पहिली कमाई फक्त 75 रुपये होती, जी त्याला ताज हॉटेलमध्ये डान्स करण्यासाठी मिळाली होती. सलमानने सांगितले होते की, ताज हॉटेलमध्ये होणाऱ्या शोमध्ये त्याचा मित्रही डान्स करत होता, त्यामुळे तो त्याला सोबत घेऊन गेला होता. सलमानने बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केले, त्यानंतर त्याला यासाठी ७५ रुपये मिळाले.

भाईजानने बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक ट्रेंड सेट केले आहेत. सलमान खान त्याच्या अप्रतिम शरीरयष्टीसाठी इंडस्ट्रीत ओळखला जातो. त्याने अनेक बॉलिवूड स्टार्सनाही फिट राहण्यासाठी प्रेरित केले आहे. त्याचवेळी शर्टलेस होऊन चित्रपटांमध्ये बॉडी फ्लॉंट करण्याचा ट्रेंडही सलमान खानकडून आला आहे. सलमानने सेट केलेले हे ट्रेंड आजही त्याचे चाहते फॉलो करतात.

चित्रपटांव्यतिरिक्त सलमान खानला पेंटिंगचीही खूप आवड आहे. त्याचा सहकलाकार आणि अभिनेता आमिर खाननेही त्याने काढलेली पेंटिंग्ज विकत घेतली आहेत. याशिवाय सलमान गाणी गातो आणि चित्रपट लिहितो. ‘बागी’, ‘चंद्रमुखी’ आणि ‘वीर’ या चित्रपटांचे लेखन सलमान खाननेच केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सलमान खान ‘या’ अभिनेत्यांना मानतो गुरू, जेव्हा चित्रपट चालत नव्हते, तेव्हा त्यांच्याकडूनच घ्यायचा सल्ले
फार्महाऊसपासून प्रायव्हेट योर्टपर्यंत, सलमान खान आहे ‘या’ लक्झरी वस्तूंचा मालक, पाहा यादी

हे देखील वाचा