सलमान खान ‘या’ अभिनेत्यांना मानतो गुरू, जेव्हा चित्रपट चालत नव्हते, तेव्हा त्यांच्याकडूनच घ्यायचा सल्ले


बॉलिवूड अभिनेता सलमान खानला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. सलमान नेहमीच त्याच्याशी संबंधित अनेक किस्से चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. फिल्मफेअरदरम्यानचा किस्सा शेअर करताना सलमानने स्वतः सांगितले की, जेव्हा त्याचे चित्रपट चालत नव्हते, तेव्हा तो सल्ला घेण्यासाठी विशिष्ट व्यक्तींकडे जात असे. सलमान सोमवारी (२७ डिसेंबर) त्याचा ५६ वा वाढदिवस साजरा करणार आहे. या निमित्ताने सलमान ज्यांना गुरू मानतो, त्या अभिनेत्यांबद्दल जाणून घेऊया…

एक किस्सा सांगताना सलमान खान (Salman Khan) म्हणाला की, जेव्हा तो अयशस्वी झाला, तेव्हा सनी देओल (Sunny Deol) त्याला सपोर्ट करायचा. तसेच करिअरच्या वाढीसाठी त्याने सनी आणि संजय दत्तची (Sanjay Dutt) मदत घेतल्याचे सांगितले. सलमान म्हणाला की, ९० च्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा तो त्याच्या करिअरमध्ये संघर्ष करत होता, तेव्हा संजय आणि सनी इंडस्ट्रीमध्ये मोठे नाव बनले होते.

सलमानने फिल्मफेअर इव्हेंटमध्ये सांगितले होते की, जेव्हाही त्याला असे वाटत होते की, चित्रपट चालत नाहीत, विस्कळीत होत आहेत, तेव्हा तो सनी आणि संजूची मदत घ्यायचा. यामुळेच त्याने सनीसोबत ‘जीत’ आणि संजयसोबत ‘साजन’ या चित्रपटात काम केले.

बॉलिवूडमधील आपल्या करिअरबद्दल बोलताना सलमानने सांगितले होते की, “आज इंडस्ट्रीत शारीरिक आणि मानसिक जागरुकता खूप आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात मार्गदर्शन करण्यासाठी लोक आहेत. कामगिरीबाबत अनेक प्रकारचे सल्लामसलती उपलब्ध आहेत. आता लोकांचे स्वतःचे वैयक्तिक प्रशिक्षक आहेत. सोबतच फक्त पराठे खायचे आणि बसायचे.”

सलमानने पुढे सांगितले की, “त्यावेळी योग्य वेळी योग्य लोक नव्हते, पण मला माझ्या वरिष्ठांचा फायदा झाला आहे.” एकूणच काय, तर सनी आणि संजूने त्याची खूप मदत केली आहे.

सलमानच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तो ‘टायगर ३’मध्ये दिसणार आहे. यामध्ये सलमानसोबत कॅटरिना कैफ आणि इमरान हाश्मी दिसणार आहेत. विशेष म्हणजे ’पठाण’ आणि ‘टायगर ३’चे कनेक्शन असणार आहे. शाहरुख ‘पठाण’मध्ये रॉ एजंटच्या भूमिकेत दिसणार असून ‘टायगर ३’मध्ये तो सलमानला मदत करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!