Thursday, July 18, 2024

किंग खानने चाहत्यांना दिलं दिवाळीचा गिफ्ट; ‘पठाण’चा धमाकेदार टीझर आला समोर

बॉलिवूडचा शाहरुख खान(Shah rukh Khan) अनेक दिवसांपासून त्याच्या अनेक प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. शाहरुख खान येत्या नवीन वर्षांत तीन चित्रपटांसह धमाका करणार आहे. नुकताच त्याच्या बहुप्रतिक्षित ‘पठाण’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. चार वर्षांनंतर शाहरुख मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे त्याच्या चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. शाहरुखने चित्रपटांपासून ब्रेक घेतला होता. चित्रपटचा टीझर अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 2 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता. पण, दिवाळीत हा धमाका करून शाहरुखने चाहत्यांना गिफ्ट दिले.

शाहरुख खानच्या आगामी तीनही चित्रपटांबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझर व्हिडीओनंतर त्यांच्या उत्साहाचा अंदाज सोशल मीडियावरून लावता येतो. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाद्वारे शाहरुख जवळपास ३ वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. हे पुनरागमन जबरदस्त असणार असल्याचे मानले जात आहे.

2 नोव्हेंबरच्या वाढदिवसाच्या ट्रीटऐवजी शाहरुखने चाहत्यांना दिवाळीची गिफ्ट दिला आहे. पठाणचा टीझर यशराज फिल्म्सने रिलीज केला आहे. ट्विटरद्वारे पोस्ट शेअर करत त्याने लिहिले,‘आता प्रतीक्षा संपली.. पठाणचा टीझर रिलीज झाला’. हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे. जो हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि तेलुगुमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाणमध्ये शाहरुखशिवाय दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. याआधी शाहरुख आणि दीपिकाची जोडी ‘ओम शांती ओम’आणि ‘चेन्नई एक्स्प्रेस’ सारख्या चित्रपटात दिसली होती. ज्यांना चाहत्यांनी खूप पसंती दिली होती. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला पठाण हा शाहरुख खानच्या तीन चित्रपटांपैकी एक आहे. पठाणशिवाय शाहरुखचा डंकी आणि जवान हे दोन चित्रपटदेखील प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांची शूटिंग भारतात आणि स्पेनमध्ये झाली आहे. ‘पठाण’मध्ये शाहरुखचा वेगळा लूक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिद्धू मूसेवाला हत्याकांडात नवा ट्विस्ट; एनआयएने केली अफसानाची 5 तास चौकशी

‘ज्यांनी आपल्यावर 200 वर्ष राज्य केले आज…’, म्हणत अनुपम खेरने ब्रिटेनचे पीएम ऋषी सुनकला दिल्या शुभेच्छा!

हे देखील वाचा