Thursday, April 17, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यालाच आवडत नाहीये त्याचा अभिनय, स्वत:च सांगितले धक्कादायक कारण

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यालाच आवडत नाहीये त्याचा अभिनय, स्वत:च सांगितले धक्कादायक कारण

सन २०१६मध्ये प्रदर्शित झालेला ‘सुलतान‘ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमात सुपरस्टार सलमान खान याच्या मित्राची भूमिका साकारणे असो किंवा ‘माई’ वेब सीरिजमध्ये खलनायकाची भूमिका असो, अभिनेता अनंत विधात याने त्याची क्षमता सिद्ध केली आहे. भूमिका छोटी असो किंवा मोठी, त्याचा अभिनय दमदार असतो. त्याच्या मोठा चाहतावर्ग आहे, जो त्याच्या अभिनयाचे कौतुकही करतो. मात्र, असे असले, तरीही त्याला स्वत:ला त्याच्या अभिनयातून खुशी मिळत नाहीये. असा खुलासा खुद्द अभिनेत्यानेच केला आहे.

अभिनयाने खुश नाहीये अनंत विधात
अभिनेता अनंत विधात (Anant Vidhaat) हा त्या अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्याचा अभिनयात चांगलाच दबदबा आहे. त्याने ‘सुलतान’ (Sultan) आणि ‘माई’ (Mai) यांच्याव्यतिरिक्त ‘गुंडे’ (Gunday) आणि ‘भारत’ (Bharat) या सिनेमातही काम केले आहे. त्याच्या या सर्व सिनेमांतील अभिनयासाठी त्याचे कौतुक करण्यात आले आहे. मात्र, तो स्वत:च त्याचा मोठा टीकाकार राहिला आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हटले की, तो त्याच्या अभिनयाने खुश नाहीये. तो म्हणाला की, “मी खूप मोठा टीकाकार आहे. माझे मित्र आणि कुटुंबीय मला विचारतात की, मी स्वत:च्या कामाने खुश का नाहीये. कारण, त्यांना हे खूप आवडते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Anant Vidhaat (@anantvidhaat)

अभिनयाने खुश नसल्याचे कारण काय?
अनंत विधातने सांगितले की, तो त्याच्या अभिनयाने खुश का नाहीये. तो म्हणाला की, “मी नेहमीपासूनच काही ना काही शिकत असतो. मला माझी अशी कोणतीही भूमिका आठवत नाही, ज्यासाठी मी स्वत:चे कौतुक केले आहे. जेव्हा मी माझ्या कामाकडे एक प्रेक्षक म्हणून पाहतो, तेव्हा मला वाटते की, हे आणखी चांगले करता आले असते.”

शाहरुख खानवर होते अनंतचे क्रश
अनंतने याच मुलाखतीत सांगितले की, त्याचा शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्यावर क्रश होते. तो म्हणाला की, “माझे पहिले क्रश हे शाहरुख खानवर होते.” याव्यतिरिक्त त्याने ऋषिकेश मुखर्जी, यश चोप्रा, राजकुमार हिरानी, विशाल भारद्वाज, विजय आनंद, मुकूल आनंद यांसारख्या कलाकारांसोबत काम करण्याचीही इच्छा व्यक्त केली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-
भावूक क्षण! अभिनेत्री हिना खानने दिला वडिलांच्या आठवणींना उजाळा, वाढदिवशी केक घेऊन पोहोचली कबरीवर
‘अरे यार, जेव्हापासून मी इंडस्ट्रीत आले…’, विजयसोबतच्या रिलेशनशिपबद्दल रश्मिकाने सांगूनच टाकलं
चित्रपटाच्या पात्रावर प्रश्नचिन्ह उपास्थित करणाऱ्यांना जान्हवीने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली…

हे देखील वाचा