Wednesday, July 2, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूडचा दबंग खान पुन्हा प्रेमात! ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीला करतोय डेट

बॉलिवूडचा दबंग खान पुन्हा प्रेमात! ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीला करतोय डेट

बॉलिवूडमधील दबंगखान म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान सतत आपल्या चित्रपटांपेक्षा जास्त आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळे जास्त चर्तेत असतो. कधी आपल्या लग्नामुळे तर कधी त्याच्या एक्स गर्लफ्रेंमुळे सतत प्रेक्षकांचे लक्ष वेधत असतो. अभिनेत्री कॅट्रीना कैफ नंतर अभिनेता पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे.

अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने आतापर्यत किती अभिनेत्रींना डेट केले आहे, हे इंडसट्रीमधील प्रत्येकच व्यक्तीला माहितीच असेल. मात्र, तरीही अभिनेत्याच्या लग्ना न करण्यावर अनेक प्रश्न केले जातात. मात्र, पुन्हा एकदा अभिनेता प्रेमात पडला आहे. हे एकूण अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सलमान नुकतंच दाक्षिणात्य अभिनेत्री पुजा हेगडे (Pooja Hegde) हिला डेट करत अल्याचे समोर आले आहे. हे दोघेही आगामी येणारा चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान‘ (Kisika Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटामध्ये एकत्र काम करत असून शुटींगदरम्या एकमेकांना डेट करत असल्याचे समोर आले आहे. झाले असे की, उमैर संधू (Umair Sandhu) याने शेअर केल्या एका ट्वीटने सोशल मीडिवर चांगलीच खळबळ माजली आहे. उमैरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “ब्रेकिंग न्युज… शहरात एक नवीन जोडपं आलं आहे. मेगा स्टार सलमान खान पूजा हेगडेच्या प्रेमात पडला आहे. सलमानच्या प्रोडक्शन हाऊसनेही पूजाला त्याच्या दोन चित्रपटांसाठी साइन केले आहे. हे दोघे सध्या एकत्र वेळ घालवत असून सलमानच्या जवळच्या मित्रानेही याला दुजोळा दिला आहे.” पण सलमान खान आणि पुजा हेगडे यांनी यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे ही गोष्ट कितपत खरी आहे हे पाहाणे खूपच महत्वाचे ठरणार आहे.

pooja hegde
Photo Courtesy Instagramhegdepooja

सलमानच्या वर्कफ्रंडबद्दल बोलायचे झाले तर तो ‘किसी का भाई किसी की जान’, ‘किक 2’, आणि ‘टायगर 3’ मध्ये पाहायला मिळणार आहे. त्याशिवया अभिनेता शाहरुख खान (Shaharukh Khan) याच्या नवीन चित्रपट पटान मध्येही सलमान पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘अशा भाषेत परत बोललात तर पोलीस तक्रार करेल कळलं?’, नेटकऱ्याच्या कमेंटवर भडकली अमृता खानविलकर
जेव्हा रीना रॉय यांनी दिली होती शत्रुघ्न सिन्हा यांना धमकी, म्हणाल्या होत्या ‘8 दिवसात लग्न केले नाही तर…’

हे देखील वाचा