सलमानचा नादच खुळा! भाईजान वर्षाकाठी कमावतो एवढे कोटी रुपये, दान-धर्मही करतो करोडोंत

भाईजान सलमान खान बॉलीवूडमधील सर्वात यशस्वी कलाकारांपैकी एक आहे. बॉक्स ऑफिसवर सलमानचे चित्रपट यशस्वी होण्याची खात्री सर्वाधिक असते. ३० वर्षांच्या कारकीर्दीत सलमानने अनेक सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. सलमान हा फक्त बॉलिवूड नव्हे तर जगातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. सलमानने ३ वर्षांपासून फोर्ब्स इंडियाच्या १०० सेलिब्रिटींच्या यादीत अव्वल स्थान गाठलं आहे. २७ डिसेंबर रोजी बॉलिवूडचा सुलतान सलमान खान हा पंचावन्न वर्षांचा झाला.

सलमान खानची ब्रँड व्हॅल्यू पाहता त्याच्या चाहत्यांच्या मनातही एक प्रश्न येणं स्वाभाविक आहे की, दबंग खान नेमका किती मोठ्या संपत्तीचा मालक आहे? पाहायला गेलो तर याची प्रत्यक्ष आकडेवारी उपलब्ध नाही, परंतु विविध माध्यमांच्या वृत्तानुसार सलमानची संपत्ती २००० कोटी ते ३००० कोटी दरम्यान असावी असा अंदाज आहे. यावर्षी जानेवारीत गल्फ न्यूजने बॉलिवूड सेलिब्रिटींची यादी जाहीर केली होती, त्यानुसार सलमानची एकूण मालमत्ता अंदाजे २६० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी होती. जर आपण ही रक्कम रुपयांमध्ये रूपांतरित केली तर ही रक्कम सुमारे २००० कोटींच्या जवळपास जाते.

२०१८ मध्ये फोर्ब्सच्या १०० सेलिब्रिटींच्या यादीनुसार सलमान खानला सर्वात श्रीमंत भारतीय सेलिब्रिटी घोषित केलं गेलं होतं. यापूर्वी २०१६ आणि २०१७ मध्येही सलमानने या यादीत अव्वल स्थान मिळवलं होतं. फोर्ब्सच्या अहवालात असं म्हटलं गेलं आहे की १ ऑक्टोबर २०१७ ते ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत सलमान खानने २५३ कोटी रुपये कमावले. टायगर जिंदा है आणि रेस ३ या चित्रपटांमधून सलमानच्या कमाईत हातभार लावला. सलमानचे गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये घर आहे. याशिवाय पनवेलमध्ये एक आलिशान फार्म हाऊस आहे. त्याच्याकडे बऱ्याच महागड्या कार्स आणि बाईक्सही आहेत. तसंच एक वैयक्तिक यॉट देखील सलमानच्या जवळ असल्याचं म्हटलं जातंय.

सलमान हा इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या कलाकारांपैकी एक आहे. ऑगस्टमधील फिल्मफेअरच्या अहवालानुसार सलमान एका चित्रपटासाठी अभिनेता म्हणून किमान ५० कोटी रुपये फी आकारतो. या व्यतिरिक्त तो निर्मात्याबरोबर नफा देखील शेअर करतो. बॉक्स ऑफिस कलेक्शनव्यतिरिक्त सलमान विविध राईट्समधूनही पैसा कमावतो. सलमान गेल्या काही वर्षांपासून छोट्या पडद्यावर सक्रिय आहे. कलर्स टीव्ही शो बिग बॉसच्या होस्टिंगमधून सलमानने भरपूर कमाई केली. माध्यमांनुसार दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानने बिग बॉस १३ साठी दर आठवड्याला सुमारे १३ कोटी रुपये फी आकारली. या हंगामात सलमानने सुमारे २०० कोटी रुपये कमाई केली.

सलमान खानने काही वर्षांपूर्वी स्वतःचं बॅनर सलमान खान फिल्म्स लॉन्च केलं, ज्या अंतर्गत तो चित्रपटांची निर्मितीदेखील करत आहे. सलमान लघुपटांनाही सपोर्ट करतो. झी५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील पंकज त्रिपाठी स्टारर चित्रपट कागजची सलमानने निर्मिती केली आहे. त्याचवेळी तो अंतिम- द लास्ट ट्रुथ या चित्रपटाची देखील निर्मिती करत आहे.

फोर्ब्सच्या यादीनुसार १ ऑक्टोबर, २०१७ ते ३० सप्टेंबर २०१८ दरम्यान सलमानने ब्रँड एंडोर्समेंटमधून कमाई केली आहे. २०१८ मध्ये जाहीर झालेल्या फोर्ब्सच्या १०० सेलिब्रिटींच्या यादीनुसार सलमानने एकूण १०० सेलिब्रिटींच्या एकूण कमाई ३१४० पैकी ८.०६ टक्के कमाई फक्त ब्रँड एंडोर्समेंटमधून केली होती. सलमान त्याच्या चॅरिटी कामांसाठीदेखील प्रसिद्ध आहे आणि तो बिंग ह्यूमनच्या या एनजीओच्यामाध्यमातून विविध क्षेत्रात मदत करतो. सलमानच्या कमाईचा मोठा हिस्सा बिंग ह्यूमन या एनजीओला जातो.

हेही वाचा-
जेव्हा भले भले सुपरस्टार मागे लपत होते, तेव्हा प्रीतीने अंडरवर्ल्ड डॉनविरूद्ध दिली होती साक्ष
मोनिका बेदीचा वाढदिवस! आजवर खुप काही ऐकलं असेल, आता वास्तव वाचा; अंडरवर्ल्डसोबत नाव जुडताच अभिनेत्रीचे असे झाले हाल
या अभिनेत्रीच्या टॉपलेस फोटोंमुळे २० रुपयांचं मासिक १०० रुपयांना झालं, मात्र नंतर नशीब फिरलं आणि…
एकेवेळी पाकिस्तानमधून धमकीचा फोन आलेले कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव आधी करायचे हे काम!

Leave A Reply

Your email address will not be published.