Friday, March 29, 2024

एकेवेळी पाकिस्तानमधून धमकीचा फोन आलेले ‘कॉमेडी किंग’ राजू श्रीवास्तव आधी करायचे ‘हे’ काम!

२५ डिसेंबर म्हणजे नाताळ! याच नाताळच्या दिवशी आपले प्रसिद्ध विनोदवीर राजू श्रीवास्तव यांचादेखील वाढदिवस असतो. २५ डिसेंबर १९६३मध्ये राजू श्रीवास्तव यांचा जन्म उत्तरप्रदेशच्या कानपुर येथे झाला. राजू हे काल ५७ वर्षांचे झाले. आज आपण सगळेच ज्यांना राजू श्रीवास्तव म्हणून ओळखतो किंवा बरेच जण हे त्यांना गजोधर भैय्या म्हणून ओळखतात पण आपल्याला ठाऊक आहे का, राजू श्रीवास्तव हे त्यांचं खरं नाव नाहीये. त्यांचं खरं नाव हे सत्यप्रकाश श्रीवास्तव होतं. तर याच सत्यप्रकाश यांच्या बद्दल म्हणजेच राजू श्रीवास्तव यांच्याबद्दल माहीत नसलेल्या गोष्टींबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

राजू श्रीवास्तव यांना लहानपणापासूनच विनोदी कलाकार होण्याची इच्छा होती. बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या  भूमिका करून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. १९८८मध्ये आलेला तेजाब हा त्यांचा पहिला सिनेमा ठरला. या चित्रपटात त्यांनी एक लहानशी भूमिका साकारली होती. १९८९ मध्ये राजश्री प्रॉडक्शनच्या मैंने प्यार किया आणि बाजीगर तसेच बॉम्बे टू गोवा अशा विविध चित्रपटांमधील इतर छोट्या भूमिकांमधून ते रुपेरी पडद्यावर झळकत राहिले. २००१ मध्ये आलेल्या आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपय्या या बॉलिवूड चित्रपटात त्यांनी अभिनेता आणि विनोदी कलाकार म्हणून काम केलं.

द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या रिऍलिटी शोमध्ये त्यांनी स्टँड-अप कॉमेडीअन म्हणून प्रवेश केला आणि त्यानंतर स्पर्धेमध्ये राजू तिसरे आहे. त्यानंतर स्पिन ऑफ द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज – चॅम्पियन्समध्ये भाग घेतला, ज्यात त्यांनी “किंग ऑफ कॉमेडी” हे विजेतेपद जिंकले. २००९ मध्ये बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाले. त्यांनी जवळपास दोन महिन्यांचा काळ त्यांनी घरात घालवला. यानंतर त्यांनी पत्नी शिखा यांच्यासह नच बलिये या डान्स रिऍलिटी शो मध्ये सहभाग नोंदवला.

समाजवादी पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कानपूरमधून श्रीवास्तव यांना निवडणुकीचं तिकीट दिलं. परंतु ११ मार्च २०१४ रोजी श्रीवास्तव यांनी तिकिट परत करून सांगितले की त्यांना पक्षाच्या स्थानिक पातळीवरून पुरेसा पाठींबा मिळत नाही. त्यानंतर, १९ मार्च २०१४ रोजी त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यानंतर पंतप्रधान मोदींनी राजू यांना स्वच्छ भारत अभियानमध्ये सहभागी करून घेतलं. तिथून आजतागायत राजू हे विविध जाहिरातींमार्फत जनतेमध्ये स्वच्छतेबद्दल जनजागृती करत आहेत.

राजू श्रीवास्तव यांनी १ जुलै १९९३ रोजी लखनऊच्या शिखा यांच्याशी लग्न केलं. त्यांना अंतरा आणि आयुष्मान ही दोन मुले आहेत. २०१० मध्ये श्रीवास्तव यांनी आपल्या शो दरम्यान अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानवरील विनोद केल्याप्रकरणी त्यांना पाकिस्तानमधून धमकीचे फोन आले होते.

हे देखील वाचा