Friday, March 29, 2024

‘या’ अभिनेत्रीच्या टॉपलेस फोटोंमुळे २० रुपयांचं मासिक १०० रुपयांना झालं, मात्र नंतर नशीब फिरलं आणि…

नव्वदच्या दशकात आपल्या सौंदर्याने आणि बोल्ड इमेजने बॉलिवूडमध्ये चर्चेत आलेला चेहरा म्हणजे ममता कुलकर्णी. बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत खूप कमी अभिनेत्रींना इंडस्ट्रीपासून दूर होऊनही लोकांच्या लक्षात राहण्याचे आणि चर्चेत राहण्याचे भाग्य लाभते. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे ममता कुलकर्णी.

‘तिरंगा’ सिनेमातून ममताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९९३ साली आलेल्या ‘आशिक आवरा’ सिनेमातून मुख्य अभिनेत्री साकारत तिने त्यावर्षीच्या ‘न्यू फेस’ या फिल्मफेयर पुरस्कारावर नाव कोरले. ममताने तिच्या करियरमध्ये आमिर खान, अक्षय कुमार, सलमान खान, सैफ अली खान आदी सुपरस्टार कलाकारांसोबत काम केले. ममताचे काम नीट चालू असतानाच अचानक तिचे टॉपलेस फोटो स्टारडस्ट मासिकाच्या मुख्य पानावर झळकले आणि एकच गोंधळ उडाला.

सिनेइंडस्ट्रीतले प्रसिद्ध फोटोग्राफर जयेश सेठ यांना स्टारडस्ट मासिकाच्या फोटोशूटसाठी एका अभिनेत्रीची गरज होती. त्याकाळच्या हिट अशा माधुरीपासून जुही पर्यंत सर्वच अभिनेत्रींनी जयेश यांना हे फोटोशूट करायला नकार दिला. तेव्हा जयेश यांनी ममताला विचारले असता ममता हो म्हणाली आणि हे फोटोशूट झाले.

Mamta Kulkarni
Mamta Kulkarni

जेव्हा हे मासिक छापून विकण्यासाठी आले तेव्हा ममताच्या मुख्य पानावर असलेल्या टॉपलेस फोटोनी एकच खळबळ माजवली. फक्त २० रुपये किंमत असलेल्या या मासिकांची १०० रुपये किमतीने ब्लॅकमध्ये विक्री झाली.

ममताचे हे फोटो पाहून काही स्त्री संघटनांनी या फोटोना विरोध करत तिच्यावर गुन्हा दाखल केला. ममतावर अनेक दिवस केस चालली. एकदा ती बुरखा घालून ममता या केसच्या सुनवाईला गेली असता तिच्यावर अनेक टीका झाल्या आणि तिला जिवेमारण्याच्या धमक्या येऊ लागल्या.

शेवटी १५००० हजार रुपये दंड भरून ती या केसमधून मोकळी झाली. असे होऊनही ममता एकदम लाइमलाईट्मधे आली आणि तिच्याकडे अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर यायला सुरुवात झाली. ममताने खूप कमी वेळात तिचे बॉलिवूडमधले स्थान पक्के केले.

एकीकडे ती यशस्वी होत असतानाच दुसरीकडे ममताचे नाव अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन सोबत जोडल्याच्या बातम्या समोर यायला सुरुवात झाली. सोबतच ड्रग्स सप्लाय मध्ये सुद्धा तिचे नाव आले. काहीच दिवसात ड्रग्स तस्कर विकी गोस्वामी सोबत तिचे नाव आले. त्यानंतर ती विकी सोबत केनिया, दुबई सारख्या देशात राहिली.

काही दिवसांनी ममताने स्वतःला एक स्वाध्वीच्या स्वरूपात बदलले. ममताने ‘ऑटोबायोग्राफी ऑफ एन योगिन’ नावाचे पुस्तकही लिहले आहे.

हे देखील वाचा