Monday, March 4, 2024

सलमान खानच्या नावाने होतोय स्कॅम, प्रोडक्शन हाउसने दिला इशारा; गुन्हेगारांवर होणार कारवाई

बाॅलीवूडमधील दबंग खान सर्वांचाच आवडता आहे.सलमानने(salman khan) इंडस्ट्रीला अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. त्याचसोबत अनेकांना चित्रपटात संधीदेखील दिली आहे. त्याने त्याच्या प्रोडक्शन हाउसद्वारे अनेक नवीन चेहऱ्यांना इंडस्ट्रीत ओळख दिली. इतकंच नाही तर अनेक लोक त्याच्यासोबत आणि त्याच्या प्रोडक्शन कंपनीसोबत कोलॅबोरेटही करू इच्छीतात. परंतू दुर्भाग्याची गोष्ट ही की काही अप्रमाणिक लोक या गोष्टीचा फायदा घेत आहेत.ही गोष्ट पुढे आल्यावर सलमान खानच्या प्रोडक्शन हाउसने एका पोस्टद्वारे सलानच्या चाहत्यांना एक इशारा दिला आहे.

काय आहे पोस्ट
काल 30 जानेवारीला सलमानच्या प्रोडक्शन हाउसने(salman khan production company) त्यांच्या ऑफिशिअल सोशल मिडिया अकाउंटवर एक पोस्ट करत लोकांना इशारा दिला आहे. या पोस्टमधून त्यांनी घोटाळा करणाऱ्यांविरुद्ध इशारा केला आहे. त्यांनी त्याच्या ऑफिशिअल एक्स हँडलवर एक भलामोठी नोट शेअर केली आहे.ज्यात त्यांनी लिहिले आहे की,”हे स्पष्ट करण्यात येते की सध्याला सलमान खान किंवा सलमान खान प्रोडक्शन कोणत्याही चित्रपटासाठी कास्टिंग कर नाहीए.”

सलमान खान करणार कारवाई
शेअर केलेल्या स्टेटमेंटमध्ये पुढे असंही लिहिलं आहे की,” आम्ही कोणतेही कास्टिंग एजंटस यासाठी कामावर घेतले नाहीत, त्यामुळे यासाठी आलेल्या कोणत्याही मेलसवर किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका.जर कोणी मिस्टर खान आणि सलमान खान फिल्म्सच्या नावाचा चुकीचा वापर करत असेल तर लवकरंच त्यांच्या विरोधात कायद्याने कारवाई केली जाईल.”

सलमान खान फिल्म्सने आधीही केले होते सुचित
जुलै 2023मध्ये देखील सलमान खान च्या ऑफिशिअल इंस्टाग्रामवर एक स्टेटमेंट शेअर केले होते. ज्या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या फॅन आणि फाॅलोवर्सला अशा फसवणुकी पासुन सावध रहण्यासाठी सुचित केलं होतं. त्यासोबतंच कास्टिंग काॅलचा स्कॅम सुरू असल्याचेही सांगितले होते. यासर्वाव्यतिरिक्त अभिनेता सध्याला ‘द बुल’साठी चर्चेत आहे. ज्याचं दिग्दर्शन विष्णुवर्धन करत आहे आणि करण जोहर त्याचा निर्माता आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

मुस्लिम असुनही पुजा-पाटावर विश्वास ठेवतात हे सेलिब्रिटी, चित्रपट रिलीज होण्याआधी जातात मंदिरात
पत्रकार बनुन भुमी पेडणेकरने उतरवला समाजातील ‘भक्षका’चा मुखवटा,म्हणाली,’ या गोष्टी आयुष्याचा भाग… ‘

हे देखील वाचा