Thursday, June 13, 2024

‘थलायवा’साठी काहीही! सिनेमाच्या रिलीज डेटदिवशी ‘या’ 2 शहरात कंपन्यांना सुट्ट्या, कंपनीनेच वाटली तिकीटे

बॉलिवूड ते टॉलिवूड अशा दोन्ही इंडस्ट्री गाजवणारे खूप कमी सुपरस्टार आहेत. यामध्ये ‘थलायवा’ रजनीकांत यांच्या नावाचाही समावेश होतो. रजनीकांत यांचा कोणताही सिनेमा येणार म्हटलं की, चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. अशात चाहते रजनीकांत यांच्या आगामी ‘जेलर‘ सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा येत्या 10 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमाबाबत साऊथमध्ये इतकी क्रेझ वाढली आहे की, असे म्हटले जात आहे की, चेन्नई आणि बंगळुरूतील काही कंपन्यांनी रजनीकांत यांच्या ‘जेलर’ सिनेमाच्या रिलीजदिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याची घोषणा केली आहे.

सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) हे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करण्यासाठी सज्ज झाले आहेत. आपल्या अभिनयाने चाहत्यांना दीवाना बनवणारे अभिनयाचे बादशाह रजनीकांत यांचा ‘जेलर’ (Jailer) सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. सिनेमाबाबत चाहत्यांची उत्सुकता यावरून स्पष्ट होते की, काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना रजनीकांत यांच्या सिनेमाचे तिकीटही मोफत वाटले आहेत.

सोशल मीडियावर केली सुट्टीची घोषणा
प्रसिद्ध इंग्रजी वृत्तामध्ये छापलेल्या बातमीनुसार, ‘जेलर’ सिनेमाच्या रिलीज डेटसाठी चेन्नई आणि बंगळुरू येथे सुट्टी घोषित केली गेली आहे. तसेच, एका कंपनीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नोट जारी करत सुट्टीची घोषणाही केली आहे. मागील काही दिवसांपूर्वी या बहुप्रतिक्षित सिनेमाचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला होता.

ट्रेलरने चाहत्यांची मने जिंकली होती. थलायवाच्या या सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांचा उत्सुकता गगनात मावेनासा झाला होता. सिनेमाविषयी बोलायचं झालं, तर यामध्ये रजनीकांत यांच्याव्यतिरिक्त रम्या कृष्णन, जॅकी श्रॉफ, तमन्ना भाटिया, शिव राजकुमार, सुनील आणि योगी बाबू यांसारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.

सिनेमातील गाणे रिलीजपूर्वीच हिट
खरं तर, सिनेमातील गाणे रिलीजपूर्वीच हिट झाले आहेत. सिनेमातील ‘कावला’ (Kaavaalaa) हे गाणे सध्या ट्रेंडिंग आहे. असेही म्हटले जात आहे की, रिलीजनंतर रजनीकांत सिनेसृष्टीतून ब्रेक घेणार आहेत. मागील काही वर्षांपासून रजनीकांत यांनी एक नियम बनवला आहे, ज्यानुसार, ते प्रत्येक सिनेमानंतर एक आध्यात्मिक ब्रेक घेतात आणि मैदानी भागात फिरण्यासाठी जातात. (thalaiva rajinikanth upcoming film jailer to release on 10 august companies give employees leave to watch movie one even distributed free tickets)

हेही वाचा-
Heart Attackनंतर अवघ्या 8 दिवसात ‘ताली’च्या शूटिंगवर परतलेली सुष्मिता; निर्मात्यांचा धक्कादायक खुलासा
जेव्हा सपना चौधरीने पहिल्यांदा केलेला स्टेज तोड डान्स, चाहत्यांनी केली होती तुडुंब गर्दी- व्हिडिओ

हे देखील वाचा