Thursday, April 25, 2024

शार्पशूटरच्या निशाण्यापासून ‘इतकाच’ दूर होता सलमान खान, केवळ ‘या’ गोष्टीमुळे वाचला जीव

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) गेल्या अनेक दिवसांपासून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर आहे. अलीकडेच सलमान खानचे वडील सलीम खान (Salim Khan) यांना मिळालेल्या धमकीच्या पत्राने मुंबई पोलिसांची झोप उडाली आहे. काही दिवसांपूर्वी जॉगिंग करत असताना सलीम खान यांना एक पत्र मिळाले होते, ज्यामध्ये सलमान खान आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या पत्राबाबत पोलिसांना लॉरेन्स बिश्नोईवर संशय आल्याने, त्याची चौकशी करण्यात आली. आता याप्रकरणी मीडियासमोर एक मोठी माहिती समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या चौकशीत मोठा खुलासा झाला आहे.

लॉरेन्स बिश्नोई याने संपत नेहराला अभिनेता सलमान खानला मारण्यास सांगितले, असे एका अहवालात सांगण्यात आले आहे. एजन्सीने २०२१मध्ये लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली होती. चौकशीत लॉरेन्सने सलमानच्या हत्येचा कट रचल्याची कबुली देताना हा खुलासा केला होता. लॉरेन्सने खुलासा केला होता की, त्याने राजस्थानचा गँगस्टर संपत नेहराला सलमान खानला मारायला सांगितले होते. त्यानंतर संपत नेहरा मुंबईला गेला होता. संपतने मुंबईत सलमान खानचे घर गाठले, पण अंतर जास्त असल्याने तो सलमान खानपर्यंत पोहोचू शकला नाही. (salman khan was nearly killed by sampat nehra sent by lawrence bishnoi)

…म्हणून वाचला सलमान खान
त्यावेळी संपतची मजबुरी अशी होती की, त्याच्याकडे पिस्तूल होती आणि त्याचा वापर करून तो लांबून लक्ष्य करू शकत नव्हता. त्यानंतर संपत नेहराने आपल्या गावातील दिनेश फौजी याच्यामार्फत आरके स्प्रिंग रायफलची ऑर्डर दिली. लॉरेन्स बिश्नोईने त्याचा जाणकार अनिल पंड्या याच्याकडून ३ ते ४ लाखांना स्प्रिंग रायफल खरेदी केली. ही रायफल दिनेश फौजीकडे होती, जी पोलिसांनी शोधून काढली आणि त्यानंतर संपत नेहराला अटक केली. २०१८-१९ मध्ये बिष्णोईने हा कट रचल्याचे सूत्रांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे, पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala) याच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचे नाव समोर आले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा