Monday, July 1, 2024

अनंत अंबानी आणि राधिकाच्या साखरपुड्यात सलमान खानची डॅशिंग एंट्री, पहाच व्हायरल व्हिडिओ

भारतातील सर्वाधिक श्रीमंत आणि उद्योगपती कुटुंब म्हणून आंबानींना ओळखले जाते. उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा (दि, 19 जानेवारी) रोजी अँटिलीया या निवासस्थानी थाटामाटात साखरपुडा पार पडला आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील अनेक कलकारांनी हजेरी लावली होती. म्हणजेच इंडस्ट्रीमधील सर्व स्टार्स एका जागेवर जमा झाले होते. या सोहळ्यामध्ये बॉलिवू़डचा भईजान म्हणजेच सलमान खान यानेदेखिल हजेरी लावली असून त्याच्या डॅशिंग लूकने अनेकांचे लक्ष वेधले होते.

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरी कोणताही कार्यक्रम असो अनेक सेलिब्रिटींना यांच्या तर्फे निमंत्रण तर असतेच. अंबानींच्या घरी पार्टी असो किंवा कार्यक्रम यांच्या प्रत्येकच कार्यक्रमाला तोडच नाही. अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या साखरपुड्यात अनेक सेलिब्रिटींसह सलमान खान (Salman Khan) यानेही शाही लूकमध्ये हजेरी लावली होती. सलमानने निळ्या रंगाचा कुर्ता-पायजामा परिधान केला होता, ज्यामध्ये तो खूपच हॅंडसम दिसत होता. त्याच्या सोबत त्याची भाची अ‍ॅलिझेह अग्निहोत्री (Alizeh Agnihotri)
देखिल होती. तिने ऑफ व्हाइट रंगाचा घागरा परिधान केला होता.

 

View this post on Instagram

 

अनंत आणि राधिकाच्या साखरपुड्याला अवघ्या बॉलिवूडने हजेरी लावली होती. रणबीर-दीपिका, अक्षय कुमार, शाहरुख खान व कुटुंब, वरुण धवन पत्नी नताशा दलालसह, तसेच सचिन तेंडुलकरअंजली तेंडुलकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पीली धूप पहन के तुम…! सुरभी ज्योतीचा दिलखुलास अंदाज
लाल रंगात खुलले प्रियांकाचे सौंदर्य, देसी गर्लने केले मुलगी मालतीसोबत पहिले फोटोशूट फोटो व्हायरल

हे देखील वाचा