‘द फॅमिली मॅन २’मध्ये स्वत: स्टंट करताना दिसली समंथा अक्किनेनी; बिहाइंड द सीन्स व्हिडिओ केले शेअर

Samantha Akkineni share a behind video of The family man 2 web series


नुकतेच काही दिवसांपूर्वी मनोज तिवारी यांची वेबसीरिज ‘द फॅमिली मॅन 2’ प्रदर्शित झाली आहे. यामध्ये अभिनेत्री समंथा अक्किनेनी हिने दमदार अभिनय केला आहे. तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले आहे. तिने नुकतेच या वेबसीरिजमधील दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

समंथाने नुकतेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून दोन बिहाइंड द सीन्स व्हिडिओ शेअर केले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो. ती कॅमेरात बघत आहे , समंथा स्टंटसाठी तयार आहे. त्यांनतर ती समोर असणाऱ्या कलाकाराला पडकते. दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती फाईट सिक्वेन्सचा सराव करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती दोन- तीन व्यक्तींसोबत भांडताना दिसत आहे.

हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. एकीकडे या वेब सीरिजला खूप प्रेम मिळत आहे, तर दुसरीकडे काही लोक ही वेबसीरिज बॅन करण्याची मागणी करत आहेत. काहीजण म्हणत आहे की, ही वेबसीरिज तमिळच्या विरोधात आहे.

समंथाने हे व्हिडिओ शेअर करून तिचे ऍक्शन डायरेक्टर आणि स्टंट परफॉर्मर यानिक बेन यांचे आभार मानले आहे. तिने हे व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की, “सगळे स्टंट स्वतः हून करून आणि त्याचे ट्रेनिंग देण्यासाठी, शरीरातील प्रत्येक भाग दुखत असूनही मला हे करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी खूप खूप धन्यवाद.”

माध्यमातील वृत्तानुसार, हे पात्र समंथाला करणे खूप अवघड होते. कारण या याआधी तिने कधीच अशी भूमिका निभावली नव्हती. तिच्यासाठी हे पूर्णपणे वेगळे आणि अवघड पात्र होते. ज्यासाठी तिला खूप मेहनत घ्यावी लागली होती. समंथाने हे पात्र निभवण्यासाठी 3 दिवस स्वतःला एका खोलीत बंद केले होते. तिने या पात्राशी निगडित अनेक वेबसीरिज पहिल्या. हे पात्र निभवण्यासाठी जोपर्यंत ती पूर्णपणे तयार नाही झाली, तोपर्यंत ती खोलीच्या बाहेर आली नव्हती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.