‘मी जे ठरवले ते काहीच नाही घडले’, म्हणत समंथाने घटस्फोटावर व्यक्त केले तिचे मत


नागा चैतन्य (Naga Chaitanya)सोबत घटस्फोट घेऊन अभिनेत्री समंथा प्रभू (Samantha Prabhu) ला दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे. तरीसुद्धा हे दोघं आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळे सतत चर्चेत आहेत. जेव्हा त्यांनी घटस्फोट घेण्याची घोषणा केली तेव्हापासून त्यांचे फॅन्स आणि दक्षिणात्य प्रेक्षकांनी सोशल मीडियावर या दोघांचा तिरस्कार करायला सुरुवात केली. या सर्व गोष्टींना सामोरे जात असूनही त्यांनी कोणालाही कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. दोघे वेगळे होण्याावरून अनेक कारणे समोर येत होती. काही दिवसांपूर्वी समंथाला एका मुलाखतीमध्ये तिच्या घटस्फोटाविषयी विचारले गेले, तेव्हा तिने एका वेगळ्याच अंदाजात उत्तर दिले.

त्या मुलाखतीच्या दरम्यान समंथाला विचारले की २०२२ कडून तुला काय अपेक्षित आहे? या प्रश्नावर उत्तर देताना ती म्हणाली की २०२१ मध्ये जे माझ्या आयुष्यात घडले. त्यानंतर मला कोणतीच अपेक्षा नाही. मला अपेक्षित असलेल्या कोणत्याही गोष्टी घडल्या नाही. त्यामुळे मी आता काहीच ठरवले नाही. २०२२ मध्ये माझ्यासाठी काय लिहिले आणि काय घडणार आहे. ते मला पाहायला आवडेल.

या दोघांच्या घटस्फोटाविषयी काही रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार असे सांगितले जात आहे की, समंथाला कधीच मूल नको होते. तिने तिचा गर्भपात देखील केला होता. समंथा आणि नागा चैतन्य यांनी २ ऑक्टोबर २०२१ या दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली. त्या दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत माहिती दिली होती.

समंथाने ‘फॅमिली मॅन २’ मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. आता ती तिच्या करिअरवर लक्ष देणार आहे. ती एकापाठोपाठ एक अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याच बरोबर तिला ‘फिलिप जॉन ‘(Philip John) यांचा चित्रपट ‘अरेंजमेंट ऑफ लव’ (arrangement of love) चित्रपटात देखील काम करण्याची संधी मिळाली आहे. समंथा सध्या अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (rashmika mandana) या कलाकारांसोबत काम करताना दिसत आहे. ‘पुष्पा द राइज ‘ (Pushpa the rise) या चित्रपटात तिने एक आइटम सॉन्ग देखील केले असून हे गाणं खूप हिट झाले आहे.

हेही वाचा-

Video: माधुरी दीक्षितने ‘लेझी लॅड’ गाण्यावर दाखवले भन्नाट मूव्ह्ज, एक्सप्रेशन्सही आहेत कमाल!

कधी वाळवंट, तर कधी समुद्रामध्ये रोमान्स करताना दिसली अंकिता; रोमँटिक प्री-वेडिंग शूट आले समोर

दोन हजार रुपयांपासून कमाईला सुरुवात करणारे रजनीकांत आज आहेत ‘इतक्या’ कोटींचे मालक


Latest Post

error: Content is protected !!