Sunday, May 19, 2024

समर्थ जुरेल आणि गश्मीर महाजनीही ‘खतरों के खिलाडी 14’चा भाग होण्याची शक्यता, मोठी माहिती आली समोर

ईशा मालवीयसोबतच्या त्याच्या ब्रेकअपच्या अफवांदरम्यान, समर्थ जुरेल धोक्याशी खेळण्यासाठी तयार आहे. ‘खतरों के खिलाडी सीझन 14’ च्या प्रसारणाची वेळ हळूहळू जवळ येत असताना, त्यातील सहभागींची नावेही समोर येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता रोहित शेट्टीच्या या शोबाबत आणखी दोन नावे समोर आली आहेत. ज्यामध्ये एक नाव समर्थ जुरेल आणि दुसरा सहभागी गश्मीर महाजनी आहे. ‘तेरे इश्क में घायाल’ नंतर गश्मीर आता या टीव्ही शोमध्ये दिसणार आहे.

समर्थ जुरेलचे ईशा मालवीयसोबत ब्रेकअप झाल्याच्या अफवा शिगेला पोहोचल्या आहेत. ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये तो त्याचीएक्स गर्लफ्रेंड ईशा मालवीयाच्या कथित बॉयफ्रेंडसोबतर असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अद्याप या दोन्ही कलाकारांकडून याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

‘खतरों के खिलाडी’चा शेवटचा सीझन दक्षिण आफ्रिकेत शूट झाला होता. यावेळी त्याचे चित्रीकरण बल्गेरियात होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. खतरों के खिलाडीच्या 14 व्या सीझनमध्ये मुनावर फारुकी, सनाया इराणी, मन्नारा चोप्रा, गश्मीर महाजनी, अंकिता लोखंडे, शोएब इब्राहिम आणि हेली शाह दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

प्रेग्नन्सीमध्येही दीपिका पदुकोण करत आहे ‘सिंघम अगेन’चे शूटिंग, सेटवरील फोटो व्हायरल
गरोदरपणात यामी गौतमला पतीने रामायण आणि अमर चित्र दिले गिफ्ट; ती म्हणाली, ‘गरोदरपणामुळे…’

हे देखील वाचा