भोजपुरी सिनेमापासून छोट्या पडद्यापर्यंत संभावना सेठने (Sambhavna Seth) स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे. संभावना तिच्या नृत्य आणि अभिनयासोबतच तिच्या अनेक वक्तव्यांमुळेही चर्चेत असते. संभावना सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या ब्लॉगच्या माध्यमातून स्वतःशी संबंधित छोट्या-छोट्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलिकडेच संभावना सेठने स्वत: आई होऊ न शकल्याने या कारणावरून ट्रोल झाल्याची तिची व्यथा मांडली आहे. संभावनाने तिच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने आई होण्यासाठी सहन कराव्या लागणाऱ्या वेदना मांडल्या आहेत. काय आहे हे संपू्र्ण प्रकरण चला जाणून घेऊ.
संभावना सेठने यूट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये संभावना पती अविनाशसोबत दिसत आहे. पती-पत्नी दोघेही मुलाबद्दल बोलताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये अविनाश आणि संभावना सांगतात की, ते दोघेही गेल्या 3 वर्षांपासून मुल होण्यासाठी प्रयत्न करत होते. 4 वेळा IVF केले गेले असले तरी चारही IVF अयशस्वी झाले आहेत. यादरम्यान अविनाशने त्याच्या पत्नीला कराव्या लागणाऱ्या ट्रोलिंगबद्दलही सांगितले आहे.
तो म्हणतो की, “अनेकवेळा लोकांनी व्हिडीओतील संभावनाच्या फिगरवर कमेंट करून ट्रोल केले. अनेक लोक असेही म्हणतात की, कुत्र्याच्या पिल्लांनाच किती दिवस खायला घालणार, तुमची बाळ कधी येणार. तसेच अनेकदा बॉडी शेमिंगचाही सामना करावा लागतो. हा व्हिडीओ फक्त यासाठीशेअर करत जेणेकरून तुम्हाला सत्य कळेल.असे म्हणत या व्हिडिओनंतर ट्रोल केले जाणार नाही,” अशी आशाही व्यक्त केली आहे.
व्हिडिओमध्ये संभावना आणि अविनाश चाहत्यांना सांगत आहेत की त्यांनी 4 वेळा IVF केले आहे आणि त्या अपयशानंतर आता पुन्हा 5व्यांदा IVF करण्याचा प्रयत्न करत आहेत. यानंतर , तिला किती वेदनादायक प्रक्रिया पार पाडाव्या लागत आहेत, हे सुद्धा संभावना सांगते आणि फ्रिजमधून तिच्या IVF उपचारासाठी अनेक इंजेक्शन्स घेते. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने सांगितले की, तिला आता हे इंजेक्शन अविनाशच देतात.त्यासोबतच तिने इंजेक्शन घेत असतानाचा व्हिडिओही शूट केला आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा-
- ज्येष्ठ अभिनेत्री हेलन एका दशकानंतर परतणार मोठ्या पडद्यावर, करिश्मा कपूरसोबत ‘या’ चित्रपटात करणार धमाल
- संगीत क्षेत्राच्या प्रेमासाठी शिवकुमार शर्मा यांनी धुडकावली होती बिग बींसोबत अभिनय करण्याची ऑफर
- ‘तुझा चश्मा आधी नीट करुन घे’, म्हणत पान मसाल्याच्या पोस्टवरून सुनील शेट्टीने चाहत्याला फटकारले