लग्नानंतर अभिनेत्री समीरा रेड्डी चित्रपटांपासून दूर गेली असली, तरीही हल्ली सोशल मीडियावर फार सक्रिय असते. चाहत्यांसोबत ती भरपूर व्हिडिओ, फोटो शेअर करत असते. समीरा रेड्डीने मुलगा हंसच्या जन्मानंतर ती प्रसूतीपूर्व नैराश्याने ग्रस्त झाल्याची कहाणी सांगितली. सुरुवातीला अभिनेत्रीने असा विचार केला होता की, समाजातील उच्च दर्जाच्या घरातील आई जशी आहे, तशी ती होईल. जी पोटात बाळ असतानाही सुंदर, सहज पोझ देऊ शकते. तिचे मातृत्वाबद्दलचे विचारही बॉलिवूडमधील अभिनेत्रींसारखे होते, पण प्रसूतीच्या वेळी तिचे वजन १०५ किलो झाले होते.
यावेळी समीराचा पती अक्षय वर्देने, तिची खूप काळजी घेतली होती. समीराने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, “पती अक्षय वर्देने बाळाचे डायपर देखील बदलले होते, आणि तिला खायला दिले होते. तो बाळाची संपूर्ण काळजी घ्यायचा, जेव्हा ती तिच्या भावनांशी झगडत होती. माझ्या सासूबाई मला म्हणाल्या होत्या की, ‘तुझे मूल निरोगी आहे, तुला एक आधार देणारा नवरा आहे, तू का अस्वस्थ आहेस?’ माझ्याकडे उत्तर नव्हते.”
अभिनेत्री पुढे म्हणते, “डिस्चार्जनंतर मी खूप रडले होते. हंससाठी मी तेथे नसल्याने, मला फार वाईट वाटले होते. असे एक वर्षापर्यंत सुरू राहिले होते. यादरम्यान मी पूर्णतः विस्कळीत झाले होते. मी चित्रपटसृष्टीतून पूर्णपणे दूर गेले होते. माझे वजन अद्यापही १०५ किलो आहे. मी प्लॅसेंटा प्रिव्हिया आजाराने ग्रस्त होते. माझे केस खूप जास्त गळत होते.”
ही एक मोठी समस्या असल्याचे समजून समीराने डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. तसेच तिच्या सर्व समस्यांविषयी ती डॉक्टरांशी बोलली होती. जास्त वजनाच्या मुलापासून, ते सिनेजगताबद्दल बऱ्याच गोष्टींवर ती डॉक्टरांशी बोलली होती. या सर्व गोष्टींपासून मुक्त झाल्यानंतर, ती स्वतःला आता एक नवीन व्यक्ती मानते.
अभिनेत्री म्हणाली की, “म्हणूनच, दोन वर्षांपासून सर्व गोष्टींपासून वेगळे राहिल्यानंतर, मी आता परत सोशल मीडियावर सामील झाले आहे, तरीही मला विचारले जाते की, ‘तब्येतीने जाड असलेली मम्मी होणार आहेस की, तू पुन्हा आकर्षक सॅम होशील?’ पण फक्त चाहते मिळविण्यासाठी मी खोट्या गोष्टींचा अवलंब करण्यास नकार दिला आहे. म्हणून मी माझ्या समस्यांबद्दल बोलण्यास सुरुवात केली. प्रथम, मला ‘योग्य’ दिसत नाही, म्हणून ट्रोल केले गेले, परंतु यामुळे मला त्रास झाला नाही. २०१८ ला जेव्हा मूल पोटात होते, तेव्हा मी स्वतःला सांगिलते होते की, मी बाळाला माझ्यासारखा करेल.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-राधे चित्रपटातील किसींग सीनबाबत दिशा पटानीचा मोठा खुलासा, म्हणाली…