Friday, April 26, 2024

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सना खानने शेअर केला पतीसोबतचा फोटो, लिहिले ‘असे’ काही

ग्लॅमर दुनियेकडे पाठ फिरवणाऱ्या सना खानने शनिवारी (२० नोव्हेंबर) तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी सनाने पती मुफ्ती अनसला खूप प्रेमळपणे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या खास प्रसंगी पतीला शुभेच्छा देताना सनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी चाहत्यांमध्ये चांगलीच पसंत केली जात आहे.

सोशल मीडियावर पतीसोबतचा एक फोटो शेअर करत तिने लिहिले की, “मी तुमच्यासाठी तशीच प्रार्थना करते, जशी मी माझ्यासाठी करते. कारण मला जे माझ्यासाठी हवे आहे, ते मला तुझ्यासाठी देखील हवे आहे. तुम्ही मला अल्लाहच्या जवळ घेऊन जाता. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.” (sana khan wished husband mufti anas on the first wedding anniversary shared photo writing a lovable note)

फोटो शेअर करत सना खानने, तिच्या पतीसोबत हजला जाण्याचीही इच्छा व्यक्त केली. तिने शेअर केलेल्या या फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये मक्का-मदीनाचे सुंदर दृश्य पाहायला मिळत आहे. त्याचवेळी सना आणि तिचा पती या फोटोत एकमेकांकडे बघताना दिसत आहेत. यात तिने लिहिले की, “आमच्यासाठी हे बॅकग्राउंड दृश्य कधी प्रत्यक्षात येईल याच्यासाठी मी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही.”

सना खानने गेल्या वर्षी अचानक घेतलेल्या दोन निर्णयांनी सर्वांना आश्चर्यचकित करून सोडले होते. तिचा पहिला निर्णय म्हणजे, तिने अभिनय आणि ग्लॅमरच्या जगाचा निरोप घेतला. त्यानंतर मुफ्ती अनस सईदसोबत गुपचूप लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. लग्न झाल्यापासून देखील ती सतत चर्चेत असते. शिवाय अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. याठिकाणी ती नेहमी तिचे आणि पतीचे फोटो शेअर करत असते.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चित्रपटपटांनंतर आता टीव्ही मालिकेत वाजणार सचित पाटीलच्या अभिनयाचा डंका, लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

-विक्रम गोखलेंवर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर अवधूत गुप्तेची भलीमोठी पोस्ट, म्हणाला, ‘माझ्यावर विश्वास ठेवून…’

-उर्मिला कोठारेने केला एरियल डान्स, व्हिडिओ पाहून हटणार नाहीत तुमच्याही नजरा!

हे देखील वाचा