Saturday, March 2, 2024

‘धनुषच्या चित्रपटात काम करणे म्हणजे निव्वळ बळजबरी’, संदीप किशनच्या विधानाने उडाली खळबळ

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतीललोकप्रिय अभिनेता आणि प्रोड्यूसर संदीप किशन सध्या चर्चेत आला आहे. त्याचा आगामी फिल्म ‘ऊरू पेरू भैरवकोना’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत एक वेगळीच चर्चा रंगली आहे. संदीप किशनने धनुषचा चित्रपट ‘कॅप्टन मिलर’ संदर्भात मोठा खुलासा केला आहे. त्याच्या वक्तव्यानंतर चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता संदीप किशनला अर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे काही चित्रपटात त्याला नाईलाज म्हणून काम करावं लागत आहे. अशी माहिती स्वतः संदीप किशनने दिली आहे.

एका मुलाखतीमध्ये संदीप किशनने कॅप्टन मिलर’ या चित्रपटात काम मिळण्याच्या संधीवर भाष्य केलं आहे. संदीप किशन म्हणाला गेल्या काही वर्षांपासून मला माझ्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी काही चित्रपटांमध्ये मला जबरदस्तीने काम करावं लागत आहे.

त्यातील एक चित्रपट म्हणजे धनुष स्टारर ‘कॅप्टन मिलर’. या चित्रपटासाठी धनुषचा फोन येताच मी होकार दिला अशी माहिती अभिनेत्याने दिली. त्याच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर उलट सुलट प्रतिक्रीया येत आहेत.

आता संदीप किशन ‘ऊरू पेरू भैरवकोना’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तयार आहे. या चित्रपटामध्ये काव्या थापर, वर्षा बोलम्मा, वेनेला किशोर हे कलाकार काम करणार आहेत. तसेच संदीप धनुषचा आगामी चित्रपट ‘D50’ मध्येही काम करणार आहे. यामध्ये एसजे सूर्या, अदिति बालन, कालिदास जयराम, सेल्वाराघवन, वरलक्ष्मी सरथकुमार हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘अचानक चेहऱ्याला मुंग्या आल्या आणि सगळं सुन्न झालं’ श्रेयश तळपदेने शेअर केला हृद्यविकाराच्या झटक्याचा अनुभव
सैफ-जयदीपच्या आगामी चित्रपटाच्या नावाचे अनावरण, या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार सिनेमा

हे देखील वाचा