मराठी आणि बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या आणि मेहनतीच्या जोरावरती श्रेयस तळपदे (Shreyash talpade) याने त्याचा एक हक्काचे स्थान निर्माण केलेला आहे. अनेक चित्रपट तसेच मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनामध्ये राज्य गाजवले आहे. परंतु गेल्या महिन्यात त्याला हृदय विकाराचा झटका आला आणि त्यामुळे त्याच्या कुटुंबासोबत त्याचे सगळे चाहते देखील काळजीत पडले. कोणतेही व्यसन नाही आणि कायमचा फिटनेसकडे लक्ष देतो. तरी त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि आता त्याचबाबत त्याने त्याच्या मुलाखतीमध्ये उल्लेख केलेला आहे.
माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये श्रेयसने हा सगळा प्रसंग सांगितला. याविषयी म्हणाला की, “हृदयविकाराचा झटका कोणाला येऊ शकतो माझा दैनंदिन आयुष्य अगदी शिस्तबद्ध असल्याने मला सगळ्यांसाठी शरीराला खूप वेळ दिला. हृदयविकाराचा झटका आल्यापासून ते हॉस्पिटलला जाईपर्यंत माझ्याकडे जवळपास दीड तास होता. शूटिंग संपली आणि मी घरी आलो त्यानंतर फोन करून मी डॉक्टरांकडे गेलो. ट्राफिकमध्ये अडकलो हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या पाच मिनिटे आधी मला अरेस्ट आला पण एवढा वेळ मला माझ्या शरीराने साथ दिली. हल्ली काळजीतल्या तिथे लोकांचा मृत्यू होतो कधी कधी तुम्हाला शरीर वेळ देत नाही. पण मी शिस्तबद्ध आयुष्य जगत असल्याने माझ्या शरीराने मला वेळ दिली आणि साथ देखील दिली.”
पुढे तो म्हणाला की, “2022 ऑक्टोबर मध्ये मला पहिल्यांदा काहीतरी वेगळं जाणवला आणि शरीराने असे सिग्नल दिले. तर त्याकडे कधीच दुर्लक्ष करू नका तेव्हा शूटिंग संपल्यानंतर मला घशाच्या इथे काहीतरी जाणवत होतो. मला दमल्यासारखं वाटत होतं मग मी डॉक्टर डॉक्टरांकडून चेकअप करून घेतलं. कारण माझ्या कुटुंबात अनेकांना हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मी आधीपासूनच खूप काळजी घेतो हे तेव्हा हे सगळं अगदी नॉर्मल होतं ”
श्रेयसन पुढे सांगितले की, “हृदयविकाराचा झटका आला त्या दिवशी मी वेलकमसाठी शूटिंग करत होतो. हारण्याचा दहा ते बारा किलो वजनाचा बेल्ट लावून मी शूटिंग केलं होतं. शूटिंग दरम्यान आमची चांगलीच मजा मस्ती देखील चालली होती. बॅकअप झाल्यानंतर जाताना मला थकवा जाणवला. मी कसा बसा चालत व्यायामपर्यंत गेलो घरी जाण्यासाठी बूट घालायला. मी खाली वाकलो तर मला छातीत खूप जड झाल्यासारखं झालं. म्हणून मी कुठेही न घालता साधी चप्पल घालून निघालो. घरी जाताना मला बेचैन झाल्यासारखं वाटत होतं. माझा डावा हातही दुखत होता मला वाटलं की, शूटिंगमुळे असेल घरी गेल्यानंतर डॉक्टरांना फोन केला. मी देखील त्यांच्याशी बोललो सांगितले मी त्याला हॉस्पिटलला घेऊन येत आहे.”
त्यावेळी माझं ब्लडप्रेशर देखील वाढलं होतं. माझ्या मुलीच्या नाणीने माझ्या हाताला मशाजही करू दिलं. तरी माझा लावा कन्नड दुखत होता. मी हॉस्पिटल आल्याचे बघितलं आणि तेवढ्यात माझ्या चेहऱ्याला मुंग्या आल्या आणि एका सेकंदात मी ब्लँक झालो. आपण अगदी रिमोट टीव्ही कसा बंद करतो तसं झालं आणि त्या पुढचं मला काहीच आठवत नाही.”
या हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयसची सर्जरी देखील झाली आणि आता त्या सर्जरीतून तो रिकव्हर झाला आहे. आणि त्यांनी पुन्हा कामाला देखील सुरुवात केलेली आहे श्रेयस तळपदे याचा ही अनोखी गाठ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘भूल भुलैया 3’मध्ये विद्या बालन बनणार मंजुलिका, चित्रपटाची रिलीझ डेटही आली समोर
मिथुन चक्रवर्ती यांच्या चाहत्यांसाठी आनंदवार्ता, हॉस्पिटलमधून डिस्चार्जसोबत अभिनेत्याची तब्येत एकदम ठणठणीत