‘मी पहिला श्वास घेतल्यापासून लोकं मला…’, लाईव्ह सेशनदरम्यान चाहत्याच्या प्रश्नावर ‘संजू बाबा’च्या लेकीचे प्रत्युत्तर


बॉलिवूड स्टारप्रमाणे स्टार किड्सची देखील तेवढीच चर्चा असते. यातच ‘संजू बाबा’ म्हणजेच बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त ही देखील त्याच्या प्रमाणेच लोकप्रिय आहे. ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. नुकतेच काही दिवसांपूर्वी त्रिशालाने तिच्या चाहत्यांसाठी एक लाईव्ह सेशन केले होते. यावेळी तिने सांगितले की, जेव्हा लोकं तिला जज करतात, तेव्हा ती कशाप्रकारे वागते. तिचे वैयक्तिक आयुष्य जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक असतात. (Sanjay dutt’s daughter trishala dutt opess up on being judge by people)

त्रिशालाला तिच्या लाईव्ह सेशन दरम्यान एका चाहत्याने विचारले की, “तुला लोकं सारखी जज करत असतात, तेव्हा तू हे सगळं कसं काय सांभाळते?” या प्रश्नांचे उत्तर देताना तिने सांगितले की, “लोक तर मला तेव्हापासून जज करतात जेव्हा मी पहिला श्वास घेतला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ही गोष्ट माझ्या परिवारासोबतच आली आहे. त्यामुळे अशा गोष्टींना मनावर नाही घेतले पाहिजे. लोकं त्यांच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक गोष्टीला जज करत असतात. जेव्हा आपण स्वतःवर नाराज असतो, तेव्हा ही दुनिया आपल्याला चुकीचे समजते. जेव्हा तुम्ही खुश असता, तेव्हा कोणीही तुम्हाला बोलत नाही.”

Photo Courtesy: Instagram/trishaladutt

त्रिशाला दत्तने पुढे सांगितले की, “आपल्याला सगळ्यांचा आदर, प्रेम आणि दया केली पाहिजे. जे तुम्हाला जज करतात त्यांचा देखील आदर करा. यासाठी नाही की, ते लायक आहेत, पण यासाठी करा कारण तुम्ही त्यांच्या लायक आहात. तुम्ही शांत राहूनच त्यांचे आभार माना कारण त्यांनी तुम्हाला खूप काही शिकवत आहेत.”

काही दिवसांपूर्वी त्रिशाला दत्तने तिच्या वडिलांच्या ड्रग्स ऍडिक्शन बाबत सांगितले होते. तिने इंस्टाग्राम चॅटदरम्यान संजय दत्तच्या ऍडिक्शनबद्दल सांगितले होते. इंस्टाग्रामवर तिला एका युजरने विचारले कारण ती एक मानसोपचारतज्ञ आहे. यावर त्याने विचारले की, तिचे वडील ड्रग्ज घेतात, यावर तिचे काय म्हणणे आहे. तिने अगदी सविस्तर या प्रश्नावर उत्तर दिले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कपिल शर्माच्या शोमध्ये भोजपुरीच्या सुूपरस्टार्सची धमाल; तर कपिल शर्माचीही बोलती झाली बंद

-‘ही’ गोष्ट अधिक प्रिय असल्यामुळे, बॉलिवुड पार्ट्यांमध्ये जाणे टाळतो अक्षय कुमार; अभिनेत्याने स्वत: केला होता खुलासा

-मीडियम शॉर्ट हेअरमध्ये बरीच सुंदर दिसतेय ऋता; नवीन हेअरकट फ्लाँट करताना दिसली अभिनेत्री


Leave A Reply

Your email address will not be published.