मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर २०२२ मध्ये अडकणार विवाहबंधनात? ज्योतिषी जगन्नाथ गुरुजींनी केला खुलासा


अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कॅटरिना कैफ (Katrina Kaif) हिच्या लग्नानंतर ज्या बॉलिवूड जोडप्यावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत ते दुसरे तिसरे कोणी नसून, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर आहेत. कालांतराने त्यांचे नाते अधिकाधिक सुंदर होत चालले आहे. अनेकदा हे जोडपे बाहेर फिरताना दिसतात. अलिकडे, मलायका आणि अर्जुनच्या मालदीव व्हेकेशनचे फोटो व्हायरल झाले होते, जे चाहत्यांना खूप आवडले होते.

लोकप्रिय सिलेब ज्योतिषी जगन्नाथ गुरुजी यांनी नुकतेच एका मुलाखतीत या दोघांच्या लग्नाबद्दल सांगितले आहे. ते म्हणाले, की हे जोडपे कधीही लग्न करू शकतात. माध्यमांतील वृत्तानुसार, ते म्हणाले की, हे स्टार जोडपे २०२२ मध्ये लग्न करू शकतात. जगन्नाथ गुरुजी म्हणाले की, अर्जुन (Arjun Kapoor) भावनिक जोडीदार आहे, तर मलायका अरोरा (Malaika Arora) व्यावहारिक आहे.

या दोघांपैकी कोणाचेही मन कमकुवत नसल्याचे त्यांनी सांगितले. या कारणास्तव, अनेक टीका आणि समस्यांना तोंड देऊनही त्यांचे नाते इतके चांगले आहे. अलिकडेच एका शोमध्ये मलायका म्हणाली की, अर्जुन हा एकमेव व्यक्ती आहे जो तिला चांगल्या प्रकारे ओळखतो. यासोबतच तिने असेही सांगितले की, तिला कोणत्याही पुरुषामध्ये सर्वात जास्त काय आवडते. छैय्या छैया गर्लने अनेकदा सांगितले आहे की, तिच्या मुलाला तिच्या अलिकडच्या जोडीदाराबद्दल सर्व काही माहित आहे आणि त्याबद्दल कंफर्टेबल आहे.

मलायकाने (Malaika Arora) असेही म्हटले होते की, तिचा प्रामाणिकपणावर विश्वास आहे आणि तिचे कुटुंब आणि मित्र बरोबर असल्यामुळे ती पुढे जाऊ शकली. मलायका म्हणाली होती की, घटस्फोट घेणे कधीच सोपे नसते. पण प्रेम नसलेले वैवाहिक जीवन जगणे वाटते तितके सोपे नसते. २०१९ मध्ये अर्जुन (Arjun Kapoor) आणि मलायका यांनी त्यांचे नाते अधिकृत केले होते. ज्योतिषी असेही म्हणतात की, अर्जुन आणि मलायका लग्नानंतर त्यांचे फिल्म प्रोडक्शन ऑफिस उघडू शकतात आणि हा एक चांगला बिझनेस असेल.

हेही वाचा :

अशाप्रकारे शूट झाला ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील रोमॅंटिक सीन शूट, प्रार्थनाने केला व्हिडिओ शेअर

नवीन घराच्या बाल्कनीमध्ये रोमॅंटिक झाले कॅटरिना आणि विकी, शेअर केला क्युट फोटो

लग्नानंतर अंकिता लोखंडेने शेअर केला गृह्प्रवेशाचा व्हिडिओ, पत्नीची साडी सांभाळताना दिसला विकी 


Latest Post

error: Content is protected !!