अरेरे..! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा हॉटेलच्या २२व्या मजल्यावरुन पडल्याने मृत्यू, पोलिसांना वेगळीच शंका


‘आइडली प्राइड’, ‘स्टार ब्लेज़र्स २२०२’ आणि ‘कन्वीनियंस स्टोर बॉयफ्रेंड्स’मधील व्हॉईस-ओव्हरसाठी प्रसिद्ध असलेली जपानी अभिनेत्री सयाका कांडा हिचे निधन झाले आहे, अशी अधिकृत माहिती तिच्या वेबसाइटने जाहीर केली आहे. ती फक्त ३५ वर्षांची होती. हॉटेलच्या २२व्या मजल्यावरून पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस हे आत्महत्येचे प्रकरण मानत आहेत, परंतु कट असण्याची शक्यताही नाकारली जात नाही.

सयाकाच्या (Sayaka Kanda) पी. आर. द्वारे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अभिनेत्री सयाका अपघाताची शिकार झाली आहे. सयाकाचे १८ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता अचानक निधन झाले. तिच्या निधनाची माहिती मिळताच तिचे चाहते देखील खूप दुःखी झाले आहेत. या बातमीवर विश्वास ठेवणे त्यांच्यासाठी कठीण होत आहे, पण सयाका आता आपल्यात नाही हे खरे आहे.

सयाका कांडा कोण आहे?

सयाका ही जपानी अभिनेत्री आणि गायिका होती. ती अभिनेता मासाकी कांडा आणि पॉप गायक सेको मत्सुदा यांची एकुलती एक मुलगी होती. डिस्नेच्या फ्रोझन चित्रपट मालिकेतील ॲनाचे पात्र जपानी भाषेत डब करण्यासाठी सयाका प्रसिद्ध आहे. मित्रू मुराता हा सयाकाचा पती होता पण २०१९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

सयाकाचा जन्म टोकियो येथील सेतागाया येथे झाला. टेरुको असाही या नावाने ओळखल्या जाणारी तिची आजी १९२४ ते २००१ या काळात काम करणारी माजी इंडस्ट्री अभिनेत्री होती. ‘बीन केक’, ‘ड्रॅगन हेड’, ‘स्कूल वॉर्स: हिरो’, ‘इमाडोकी जपानी यो’, ‘फेअरवेल’, ‘कामेन रायडर डेन-ओ’, ‘अमेझिंग ग्रेस’, ‘रियल गर्ल’ हे या अभिनेत्रीचे लोकप्रिय चित्रपट आहेत. यासह, सायका अनेक सिंगल्स, अल्बम, टीव्ही शो, थिएटर, व्हिडिओ गेम्स, ॲनिमेशन चित्रपट आणि इतर अनेक उद्योगांमध्ये देखील दिसली. तिची कुटुंब आणि मित्रमंडळींना नेहमीच आठवण येईल.

सयाका कांडा सापडली रक्तबंबाळ अवस्थेत

माध्यमांतील वृत्तानुसार, सयाका कांडा हॉटेलच्या बाहेर रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. तिची खोली २२ व्या मजल्यावर होती आणि तिथून ती खाली पडली होती. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण तिचा जीव वाचू शकला नाही. पोलिस सध्या याला आत्महत्येचे प्रकरण मानत आहेत. पण सयाकाचे मित्र ती आत्महत्या करू शकत नसल्याचे सांगत आहे.

हेही वाचा :

अशाप्रकारे शूट झाला ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील रोमॅंटिक सीन शूट, प्रार्थनाने केला व्हिडिओ शेअर

नवीन घराच्या बाल्कनीमध्ये रोमॅंटिक झाले कॅटरिना आणि विकी, शेअर केला क्युट फोटो

लग्नानंतर अंकिता लोखंडेने शेअर केला गृह्प्रवेशाचा व्हिडिओ, पत्नीची साडी सांभाळताना दिसला विकी 


Latest Post

error: Content is protected !!