‘डिलिव्हरी झाल्यावर मला ५०-५० हजार रुपये द्या’, भारती सिंगने फोटोग्राफरकडे केली अजब मागणी


विनोद हा आपल्या मनोरंजन क्षेत्रातील एक महत्वाचा घटक आहे. विनोदी कलाकार म्हणून आपण नेहमीच पुरुषांना पाहिले आहे. परंतु ही परंपरा मोडून अनेक महिला कलाकारांनी विनोदी भूमिका निभावल्या आहेत. यातीलच एक मोठे नाव म्हणजे भारती सिंग. भारती सिंगने अनेक कॉमेडी शोमध्ये काम केले आहे. अशातच तिने तिच्या चाहत्यांना ती आई होणार आहे. ही गोड बातमी दिली आहे. प्रेग्नेंसीमध्ये देखील ती काम करत आहे. अशातच एका ठिकाणी ती स्पॉट झाली आहे. यावेळी फोटोग्राफरसोबत तिने मस्ती केली. तसेच तिने हे सांगितले की, तिला मुलगा पाहिजे की, मुलगी? भारतीने हे देखील सांगितले की, तिला बाळ झाल्यावर सगळ्या चॅनेलने मला ५०-५० हजार रुपये द्या.

सेलिब्रेटी फोटोग्राफर व्हायरल भयानीने भारती चा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारती फोटोग्राफरसोबत मस्ती करत आहे. यावेळी ती म्हणते की, “सगळ्या चॅनेलने मला ५०-५० हजार रुपये दया. माझ्या डिलिव्हरीचा खर्च तर निघाला पाहिजे ना. आम्हाला आमच्या पद्धतीने ही बातमी द्यायची होती, परंतु तुम्ही सगळा सस्पेन्स घालवला. जेव्हा आम्हाला बेबी होईल तेव्हा तुम्हाला सांगेल की, कोणत्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी होणार आहे. तेव्हा सगळ्यांना मला ५०-५० हजार रुपये द्या.”

दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तिला विचारतात की, तिला मुलगी हवीये का मुलगा? यावर ती उत्तर देते की, “मुलगी, मला एक मेहनती मुलगी पाहिजे. मुलीला बोलू शकतो की, बेटा चहा कर मम्मी घरी येणार आहे. मुलाला सांगितले तर तो ऐकणार नाही. त्यामुळे मुली बेस्ट असतात.”

नुकतेच भारतीने एक व्हिडिओ शेअर केला होता आणि सांगितले होते की, ती आई होणार आहे. या व्हिडिओमध्ये भारती वेगवेगळ्या पोशाखात दिसत होती. हा व्हिडिओ शहेअर करून तिने लिहिले होते की, “मॉम टू बी, आई होताना मजा येत आहे.”

भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांनी एका युट्यूब चॅनेलवरून ते दोघे आई बाबा होणार आहेत याची माहिती दिली होती. या व्हिडिओमध्ये भारती हातात प्रेग्नेंसी किट घेऊन येते. ज्यातून समजते की, ती प्रेग्नेंट आहे. तिथे हर्ष झोपलेला असतो. तिथे मुलाच्या रडण्याचा आवाज येतो आणि हर्ष झोपेतून उठतो. यानंत भारती त्याला सांगते की, ती प्रेग्नेंट आहे. हे ऐकून हर्ष खूप खुश होतो. आई-वडील बनण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो.

हेही वाचा :

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर २०२२ मध्ये अडकणार विवाहबंधनात? ज्योतिषी जगन्नाथ गुरुजींनी केला खुलासा

अभिनेता गोविंदाच्या वाढदिवशी जाणून घ्या त्याच्या एकूण संपत्तीचा आकडा, महिन्याची कमाई ऐकून होतील डोळे पांढरे

काय सांगता! सारा अली खानला तिच्या स्वयंवरात पाहिजे ‘हे’ लग्न झालेले कलाकार नावं ऐकून तुम्ही व्हाल चकित

 

 


Latest Post

error: Content is protected !!