Tuesday, June 18, 2024

‘म्हणून तुम्ही “माय बापच” आहात’ संकर्षण कऱ्हाडेने शेअर केली त्याला मिळालेली ‘ती’ पोचपावती

मराठी मनोरंजनविश्वातील अष्टपैलू आणि हरहुन्नरी अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. उत्तम कवी, लेखक, अभिनेता अशा विविध भूमिकांमधून त्याने त्याच्यात असणाऱ्या सुंदर प्रतिभेचे सर्वांना दर्शन दिले. टेलिव्हिजन, सिनेमा आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये तो सतत काम करताना दिसतो. सध्या संकर्षणचे रंगभूमीवर काही नाटकं चालू असून त्या नाटकांमधील काहींमध्ये तो भूमिका करतोय तर काही नाटकांचे त्याने लेखन केले आहे. त्याच्या आता चालू असणारी आणि प्रेक्षकांनाच उदंड प्रेअतिसाद मिळणाऱ्या नाटकांपैकी एक नाटक म्हणजे ‘तू म्हणशील तसं’. मागील बऱ्याच काळापासून संकर्षणचे हे नाटकं तुफान गाजत आहे. याच नाटकाच्याबाबतीत एक एक घडलेला सुंदर आणि लक्षात राहणारा अनुभव त्याने सांगितला आहे.

संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. तो सतत त्याचे विविध अनुभव, कामाबद्दलची माहिती त्याच्या फॅन्ससोबत याच माध्यमातून शेअर करत असतो. आता नुकताच त्याने त्याचा ‘तू म्हणशील तसं’ या नाटकादरम्यानचा अनुभव सोशल मीडियावरून चाहत्यांना सांगितला आहे. नाटक झाल्यानंतर त्याच्या फॅन्सने त्याला भेटून ज्या भावना व्यक्त केल्या त्या त्याने त्याच्या पोस्टमधून सर्वाना सांगितल्या आहेत. संकर्षणाने त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “म्हणून “रसिक प्रेक्षक माय बाप आहेत..”
आज ‘तू म्हणशील तसं’चा ३०० वा प्रयोग पार पडला.. प्रयोगानंतर एक काका-काकू आले आणि मला म्हणाले , “आम्ही, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले ह्या सगळ्यांची नाटकं पाहात आलोय.. त्यांची कामं पाहाताना सकारात्मक उर्जा जाणवायची, जाणवते.. तीच उर्जा तुझ्या कामांत आणि प्रेजेन्स मध्ये आहे… ती टिकवून ठेव… आणि खाऊसाठी हे ५०० रूपये घे…”
मी घेत नव्हतो… पण त्यांचा आग्रह मी मोडला नाही. आई बाबा खाऊसाठी पैसे देतात, तसेच ४०० रुपयांचं तिकिट काढून परत वेगळे खाऊचे ५०० रुपये द्यावे वाटणं, ही फार मोठी गोष्टं आहे… सोबतच मोठ्या मनाने दिलेली दाद आहेच… म्हणून तुम्ही “माय बापच” आहात..अशाच शुभेच्छा कायम ठेवा…”

संकर्षणच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी एकापेक्षा कमेंट्स करत तू या सर्व कौतुकास पात्र असल्याचे सांगितले आहे. दरम्यान त्याचे ‘तू म्हणशील तसं’ हे नाटक प्रसाद ओकने दिग्दर्शित केले असून, प्रश्न दामले यांनी नाटकाची निर्मिती केली आहे. लवकरच संकर्षण चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासोबत नवीन नाटकात दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॅक टू बॅक फ्लाॅप चित्रपटांवर अखेर अक्षय कुमारने साेडले माैन; म्हणाला, ‘ही माझी चूक…’

‘तारक मेहता’ वयाच्या 42 व्या वर्षी पुन्हा अडकला लग्नबंधनात, इंटिरियर डिझायनर चांदनीसोबत थाटला संसार

 

हे देखील वाचा